• Home
  • Bollywood
  • News
  • Urvashi Rautela's filmfare dress| FilmFare awards 2020| Urvashi Rautela fashion| Celebrity Fashion

फॅशन / उर्वशीचा गाऊन तयार व्हायला लागले तब्बल 730 तास, चार लोकांच्या जागेवर एकटी बसली ही अ‍ॅक्ट्रेस

  • फिल्मफेअर 2020 मध्ये झोया अख्तरच्या 'गली बॉय'ने सर्वाधिक म्हणजे 13 अवॉर्ड आपल्या नावी केले. 
  • यापूर्वी संजय लीला भन्साळींच्या 'ब्लॅक'ला 2006 मध्ये 11 कॅटेगरीत अवॉर्ड मिळाले होते. 

दिव्य मराठी वेब टीम

Feb 19,2020 12:16:18 PM IST

एंटरटेन्मेंट डेस्कः शनिवारी फिल्मफेअर पुरस्कर सोहळा पार पडला. या सोहळ्याला बॉलिवूड सेलेब्स डिझायनर ड्रेसेसमध्ये रेड कार्पेटवर अवतरले होते. यावेळी अभिनेत्री उर्वशी रौतेलाने डिझायनर अल्बीना डायलाचा रेड गाऊन परिधान केला होता. कार्यक्रमामध्ये रेड कार्पेटवर चालताना उर्वशीने घातलेल्या ड्रेसकडे पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले होते. विशेष म्हणजे, हा ड्रेस सांभाळण्यासाठी या अभिनेत्रीला चार लोकांचा आधार घ्यावा लागला होता. स्वतः उर्वशीने तिच्या या खास ड्रेसचे वैशिष्ट्य सांगितले.

730 तासांत तयार झाला ड्रेस...


अवॉर्ड सेरेमनीत उर्वशीने परिधान केलेला हा ड्रेस तयार करण्यासाठी डिझायनरला 730 तास लागले. याची लांबी एवढी होती की आजूबाजूच्या चार खुर्च्यावर कोणालाही बसता आले नाही. उर्वशीने तिच्या संपूर्ण टीमचे आभारदेखील व्यक्त केले.

'गली बॉय'ने जिंकले सर्वाधिक अवॉर्ड


शनिवारी पार पडलेल्या या अवॉर्ड सोहळ्यात रणवीर सिंह स्टारर 'गली बॉय' या चित्रपटाला सर्वाधिक म्हणजे 13 पुरस्कार मिळाले. चित्रपटाने बेस्ट अॅक्टर, अॅक्ट्रेस आणि फिल्मचा अवॉर्ड आपल्या नावी केला. यापूर्वी 2006 मध्ये संजय लीला भन्साळींच्या 'ब्लॅक' चित्रपटाने 11 पुरस्कार जिंकले होते. 'गली बॉय'ने 'ब्लॅक'चा रेकॉर्ड मोडित काढला आहे.

X