आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - 26/11च्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सहभागी असणाऱ्यांची माहिती देणाऱ्यास अमेरिका 50 लाख डॉलर (35.5 करोड रूपये) बक्षीस देणार आहे. हल्ल्याची योजना तयार करणाऱ्या किंवा त्यास मदत करणाऱ्यांची माहिती देणाऱ्यास बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा अमेरिकेचे विदेश मंत्री मायकल आर पोम्पियो यांनी रविवारी जाहीर केले.
हल्ल्यात 6 अमेरिकी नागरिकांचा झाला होता मृत्यू
> पोम्पियो यांनी सांगितले की, ''26/11 च्या दहशतवादी हल्ल्याने पूर्ण जगाला हादरून टाकले होते. अमेरिकी सरकार आणि सर्व नागरिकांकडून मी भारत आणि मुंबईबद्दल सहानुभूती व्यक्त करत आहे. या हल्ल्यामध्ये भारतीय नागरिसांसमवेत सहा अमेरिकी नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते.''
> पोम्पियो पुढे म्हणाले की, पाकिस्तानला या भ्याड हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्या लश्कर-ए-तोयबा आणि इतर दहशतवादी संघटनांवर बंदी घालण्यासाठी सांगणार आहे. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सहभागी असणाऱ्या गुन्हेगारांवर 10 वर्षांनंतरही कारवाई झाली नाही ही पीड़ित कुटूंबीयांसाठी अत्यंत दु:खद बाब आहे.
26/11 ला नेमके काय झाले?
> 26 नोव्हेंबर 2008 रोजी 10 दहशतवादी कराचीहून समुद्र मार्गाने मुंबईत दाखल झाले होते. त्यांनी छत्रपती शिवाजी टर्मिनल, ताज हॉटेल आणि यहूदी केंद्रासह इतर ठिकाणी हल्ला केला होता. जवळपास 60 तासांपर्यंत ही चकमक चालली होती. या हल्ल्यात 166 लोक मारले गेले होते. मृतांमध्ये 28 विदेशी नागिरकांचा समावेश होता. यावेळी 10 अतिरेक्यांपैकी कसाबला जीवंत पकडण्यात यश आले होते.
दहशतवादाला सामोरे जाण्यास पू्र्वीपेक्षा सक्षम - नेव्ही चीफ
> नेव्ही चीफ एडमिरल सुनील लांबा यांनी सांगितले की, 26/11 हल्ल्यापासून आपण खूप पुढे आलो आहोत. भारताने दहा वर्षांत अनेक स्तरांवरील उच्च प्रतीची देखरेख आणि सुरक्षा यंत्रणा तयार केली आहे. या सुरक्षा आणि देखरेख यंत्रणेमुळे भारताची समुद्र सीमा जवळ-जवळ अभेद्य झाली आहे. याप्रकारच्या हल्ल्यांचा सामना करण्यासाठी आम्ही पहिल्यापेक्षा अधिक सक्षम आहोत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.