आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • US Bans Foreigners Visiting China; So Far, 259 People Have Died, 11791 Affected

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनला भेट देणाऱ्या परदेशी नागरिकांना अमेरिका बंदी; आतापर्यंत २५९ जणांचा मृत्यू, ११,७९१ बाधित

एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • दिलासा : २४३ जण बरे होऊन रुग्णालयातून परतले

वॉशिंग्टन /बीजिंग- कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी अमेरिकेने सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. त्यानुसार गेल्या दोन आठवड्यात चीनला भेट देणाऱ्या परदेशी नागरिकांना परिस्थितीत सुधारणा होईपर्यंत अमेरिकेत प्रवेशबंदी लागू होणार आहे. 

अमेरिकेचे आरोग्य मंत्री एलेक्स एजार म्हणाले, अमेरिकी नागरिक चीनमधून मायदेशी परतू लागले आहे. त्यांनाही पहिले १४ दिवस निगराणीखाली ठेवले जाणार आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनियिंग म्हणाले, अमेरिकेने अयोग्य पाऊल उचलले आहे. अमेरिकेचा निर्णय जागतिक आरोग्य संघटनेच्या विरोधात आहे. 

चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत २५९ जणांचा मृत्यू झाला तर आतापर्यंत ११ हजार ७९१ जणांना बाधा झाली आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या म्हणण्यानुसार बाधित लोकांचा रहिवास ३१ प्रांतात आहे. त्यापैकी १ हजार ७९१ जणांची प्रकृती गंभीर आहे.
   
दिलासा : २४३ जण बरे होऊन रुग्णालयातून परतले
   
चीनच्या आरोग्य आयोगाच्या म्हणण्यानुसार शनिवारपर्यंत उपचारांती २४३ जण घरी परतले. या समस्येचा मुकाबल्यासाठी पारदर्शकता,जबाबदारीने काम करत असल्याचे आयोगाने म्हटलआहे.
   
आदेश : विवाह थांबवले, अंत्यसंस्कारात सतर्कता
   
चीनमध्ये विवाहासाठी २ फेब्रुवारी हा शुभ मानला जातो. या दिवशी ०२०२२०२०’ असा संयोग आहे. पण तूर्त तरी नागरिकांनी विवाह टाळावे, अंत्यसंस्कारावेळी योग्य खबरदारी घ्यावी, अशी सूचना सरकारने दिली आहे. 
   
निर्णय : पाक आपल्या नागरिकांना नाही बाेलावणार
   
पाकिस्तान वुहानमध्ये अडकलेल्या लाेकांना मायदेशी बाेलावणार नाही. आराेग्य मंत्री डाॅ. जफर मिर्झा म्हणाले, पाकिस्तानने जागतिक आराेग्य संघटनेच्या प्रस्तावाचा विचार करून हा निर्णय घेतला.