आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावॉशिंग्टन - भारत-अमेरिकेतील द्विपक्षीय संबंध आणखी दृढ होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. त्याचाच भाग म्हणून भारतात सहा नागरी अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. त्याचबरोबर अणु पुरवठादार गटाचे (एनएसजी) सदस्यत्व मिळावे यासाठी भारतास पाठिंबा दिला आहे.
भारत-अमेरिका यांच्यातील सामरिक सुरक्षा पातळीवरील चर्चेच्या समारोपप्रसंगी उभय देशांनी हा ठराव जाहीर केला. दोन्ही देशांतील ही नववी बैठक होती. परराष्ट्र विभागाचे सचिव विजय गोखले व अँड्री थॉमसन यांच्यात ही बैठक दिली. त्यात शस्त्र नियंत्रण व आंतरराष्ट्रीय सुरक्षेच्या पातळीवर चर्चा झाली.
भारतात सहा नागरी अणुऊर्जा प्रकल्पांची उभारणी करण्यावर सहमती झाल्यामुळे हा ऐतिहासिक करार मानला जातो. ऑक्टोबर २००८ मध्ये उभय देशांत यासंबंधी करार झाला होता.
अणु पुरवठादार गटांत भारताला सदस्यत्व मिळावे यासाठी आपला पाठिंबा अाहे, असे अमेरिकेने बुधवारी एका बैठकीनंतर पुन्हा स्पष्ट केले. ४८ सदस्यीय एनएसजीमध्ये भारताच्या सदस्यत्वाच्या मार्गात चीनने अडथळा आणला आहे. सुरक्षा परिषदेच्या मार्गातही चीनने खोडा घालण्याचे काम सुरूच ठेवले आहे. १२ मार्च रोजी अतिरिक्त सचिव इंद्रा पांडे व यिलीम पॉब्लेट यांच्यात चर्चा झाली. बैठकीत अंतराळातील धोके, राष्ट्रीय प्राधान्यक्रम, द्विपक्षीय सहकार्य, संधींवरही विचार-विनिमय करण्यात आला. दरम्यान, भारताने अमेरिकेसोबत अणुसंबंधी करार केला आहे. भारताचे अमेरिकेशिवाय फ्रान्स, रशिया, कॅनडा, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, ब्रिटन, जपान, व्हिएतनाम, बांगलादेश, कझाकस्तान, दक्षिण कोरियाशीदेखील आण्विक करार आहेत. दरम्यान, अमेरिकेच्या बी-५२ या बॉम्बवर्षाव करू शकणाऱ्या दोन लढाऊ विमानांनी गेल्या दहा दिवसांत दक्षिण चीन सागरावर उड्डाण केले.अमेरिकेच्या हवाई दलाच्या प्रशांत कमांड विमानांनी दक्षिण चीन सागर भागात १३ मार्चला आसपासच्या भागात नियमित प्रशिक्षण उड्डाण केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.