Business / अमेरिकी कंपन्यांनी चीनमध्ये व्यवसाय बंद करावा : डोनाल्ड ट्रम्प

रात्री 12 वा. : अमेरिकी बाजार कोसळला

वृत्तसंस्था

Aug 24,2019 08:46:00 AM IST

अमेरिका व चीनदरम्यान व्यापारयुद्ध चांगलेच भडकले आहे. चीनने शुक्रवारी अमेरिकेच्या ७५ अब्ज डॉलरच्या उत्पादनांवर आयात शुल्क लागू करण्याची घोषणा केली. यावर अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी तत्काळ पलटवार करत अमेरिकी कंपन्यांना चीनमधील आपला व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले. तत्काळ लागोपाठ ट्विट करून ट्रम्प म्हणाले, “आपल्या देशाने वेडेपणात चीनमध्ये व्यवसाय करताना अब्जावधी डॉलर गमावले. चीन आपली बौद्धिक संपदा चोरून अब्जावधी डॉलर कमवत आहे. मात्र, आता हे घडणार नाही. आता आपल्याला चीनची गरज नाही. वास्तविक चीनला वगळून आपण चांगल्या स्थितीत राहू शकतो.’ ट्रम्प यांच्या या घोषणेनंतर अमेरिकी शेअर बाजार चार तासांत ३ टक्क्यांनी घसरला होता. इतर देशांमध्ये कंपन्यांनी तत्काळ नवा पर्याय शोधावा. अमेरिकेसाठी ही नामी संधी आहे.’ ट्रम्प यांनी यासोबत फेडएक्स्, अमेझॉन, यूपीएस कंपन्यांना चीनमधून येणाऱ्या फेंटानिल औषधाची डिलेव्हरी बंद करावी, असे आदेश दिले. या औषधाने दरवर्षी अमेरिकेत १ लाख लोक मृत्युमुखी पडतात, असा दावा ट्रम्प यांनी केला.


भास्कर एक्स्पर्ट : अमेरिकी कंपन्या खरेच चीनमधून निघाल्या तर भारताला फायदा होईल
ट्रम्प यांच्या आदेशान्वये अमेरिकी कंपन्या खरेच चीनबाहेर पडल्या तर भारताला लाभ होईल. मात्र, सर्वच कंपन्या भारतात येतील, असे नाही. वस्त्रोद्योगासाठी बांगला देश, व्हिएतनाम व भारत हे पर्याय आहेत. ज्या क्षेत्रातील कंपन्यांना आपापल्या धोरणानुसार जो देश अनुकूल वाटेल तेथे या कंपन्या जाऊ शकतात. सध्या तरी बहुतांश अमेरिकी कंपन्या भारतात येण्याची शक्यता आहे.

असीम चावला
इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सचे विभागीय अध्यक्ष

X
COMMENT