आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्मतःच अनाथाश्रमात सोडून गेले आई-वडील, चेहरा पाहून कोणीही दत्तक घ्यायला तयार होईना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रासेल्टन - ही व्यथा आहे एका चिनी मुलीची. इतर मुलींसारखे न दिसण्याची शिक्षा तिला मिळाली आहे. जन्मानंतर काही दिवसांतच आई वडिल या मुलीला अनाथाश्रमात सोडून गेले. त्यानंतर ती अनाथाश्रमात नवे कुटुंब कधी मिळणार यासाठी वाट पाहत राहिली. पण कोणीही तिला दत्तक घ्यायला तयार झाले नाही. एक दिवस फेसबूकवर एका अमेरिकन दाम्पत्याला या मुलीचा फोटो दिसला तेव्हा त्यांना तिची किंमत समजली. त्यांना मनापासून असे वाटले की ही आपली मुलगी आहे आणि त्यांनी तिला दत्तक घेतले. 


आजारामुळे डोळे झाले असे 
- तीन वर्षांपूर्वी जन्मलेली प्रिमरोज गंभीररित्या ग्लुकोमाने पीडित आहे. त्यामुळे तिचे डोळे पूर्णपणे सिलव्हर ब्लू रंगाचे आहेत आणि तिला जराही दिसत नाही. 
- या आजारामुळे प्रिमरोजला तिच्या आई वडिलांनी काही दिवसांतच सांभाळण्यास नकार देत अनाथाश्रमात सोडले. 
- एका अमेरिकन कपलने तिचा फोटो पाहिला आणि त्यांना जणू धक्काच बसला. या दाम्पत्याला दोन मुले होती. पण या मुलीला पाहून त्यांना वाटले जणू आपल्या जीवनात या मुलीची कमतरचा आहे. 
- या मुलीबाबत समजल्यानंतर तर त्यांनी प्रिमरोजला दत्तक घेण्याचा निर्णयच घेतला. जानेवारी 2016 मध्ये त्यांनी तिला अमेरिकेला आणले. 
- या मुलीला पाहिले तेव्हा जणू तिनेच आम्हाला तिच्याकडे खेचले अशी काहीसी अध्यात्मिक जाणीव झाल्याचे या दाम्पत्याने सांगितले. 

 

बातम्या आणखी आहेत...