आई-वडील करत होते आपल्याच 13 मुलांवर अत्याचार, घरातील कैदखान्यात सर्वांना केले होते बंदी; अखेर दाम्पत्याला मिळाली 25 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा

दिव्य मराठी

Apr 22,2019 01:05:00 PM IST

वॉशिंगटन - अमेरिकेच्या एका कोर्टाने आपल्या 13 मुलांसोबत अमानवीय व्यवहार करणाऱ्या एक दाम्पत्याला 25 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. डेव्हिड आणि लुइस टरपिन यांच्यावर कॅलिफोर्निया येथील राहत्या घरातील कैद खान्यात मुलांना बंद करून त्यांच्यावर अत्याचार करण्याचा आरोप होता. शुक्रवारी त्यांच्या दोन मुलांनी कोर्टात दिलेल्या साक्षीवरून त्यांना दोषी ठरविण्यात आले. गेल्या वर्षी 13 मुलांपैकी एकाने कैदखान्यातून सुटाक करून पोलिसांना संबंधीत प्रकार सांगितल्यानंतर हे प्रकरणे उघडकील आले. यानंतर दाम्पत्याला अटक करण्यात आली होती.


मुलीने सांगितले - महिनोमहिने साखळ्यांनी बांधून ठेवत होते

> साक्ष देणाऱ्या दोन मुलांमध्ये एक मुलगी आहे. ती आता महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. तिने सांगतिले की. आई-वडील सर्व मुलांचा छळ करत होते. त्यांना जेवण देत नव्हते तसेच कधी आंघोळ करू दिली नाही.

> मुलीने म्हणणे आहे की, त्यांना अनेकदा महिन्यांपर्यंत लोखंडी साखळ्यांनी बांधून ठेवण्यात येत होते. यादरम्यान कोणी आजारी पडल्यास आई-वडील त्यांना रूग्णालयात तर कधी नेले नाही पण त्यांच्या औषधोपचार देखील केला नाही. सर्व मुलांना बाहेरील जगापासून पूर्णपणे वेगळे केले होते.

> घरातून पळून जात पोलिसांनी घटनेची माहिती देणाऱ्या मुलाचे वय 27 वर्ष आहे. त्याला वयाच्या दुसऱ्या वर्षापासून घरातील कैदखान्यात बंदी करण्यात आले होते.


एक मुलगा म्हणाला - आम्ही नवीन आयुष्य मिळाले

> शुक्रवारी कोर्टातील सुनावणी दरम्यान एका मुलाने सांगितले की, आई-वडिलांनी त्यांचे आयुष्य नर्कापेक्षाही वाईट केले होते. या कैदेतून सुटका झाल्यानंतर त्याला नवीन आयुष्य मिळाल्यासारखे वाटत असल्याचे तो म्हणाला.

> मुलांनी पोलिसांना सांगितले की, सुरुवातीला त्यांना दोरीने बांधत होते. पण जेव्हा त्यांचा भाऊ घरातून पळून गेला तेव्हापासून त्यांना लोखंडाच्या साखळीने बांधण्यात येत होते. शक्यतो त्यांना बिछाण्याला बांधत होते.

> मुलांचे म्हणणे आहे की, आई-वडिलांनी त्यांना ज्या यातना दिल्या त्याविषयी विचार केल्यानंतरही अंगावर काटा येतो. आताही रात्री आम्हाला भयावक स्वप्न पडतात. आम्ही मोठे होत असताना जे काही पाहण्यास मिळाले ते अतिशय भयंकर होते.

X