आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावॉशिंग्टन - अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटागनने पाकिस्तानला दिल्या जाणाऱ्या 1.66 अब्ज अमेरिकन डॉलर अर्थात 12 हजार कोटी रुपयांचा निधी रद्द केला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार बुधवारी ही घोषणा करण्यात आली आहे. तत्पूर्वी ट्रम्प यांनी पाकिस्तानला एक मूर्ख राष्ट्र असे संबोधताना त्यांनी कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनला अबोटाबाद येथे शरण दिली होती असे म्हटले. ट्रम्प यांच्या निर्णयाचा माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळातील अधिकाऱ्यांनीही अप्रत्यक्षरित्या समर्थन केले.
ट्रम्प प्रशासन हतबल...
माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि मध्य आशिया प्रकरणांचे मंत्री राहिलेले डेविड सिडनी यांनी ट्रम्प यांच्या निर्णयाचे अप्रत्यक्षरित्या समर्थन केले. अमेरिकेने पाकिस्तानचा मदत निधी रोखला, यातून ट्रम्प प्रशासन किती हतबल झाले आहे हे स्पष्ट होत आहे. ही गोष्ट खरी आहे, की पाकिस्तानचे नेते त्यांच्या देशातील दहशतवादावर नियंत्रण ठेवण्यात कुचकामी ठरले आहेत. सोबतच त्यांनी अमेरिकेच्या दहशतवादविरोधी कारवायांना गांभीर्याने सहकार्य केले नाही. त्यामुळे, अमेरिकेला हा निर्णय का घ्यावा लागला याचा पाकिस्तानने विचार करायलाच हवा असेही ते म्हणाले.
पाकला लादेनची माहिती होती...
काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पाकिस्तान सरकारवर बरसले. अमेरिकेचा सर्वात मोठा गुन्हेगार आणि जगातील सर्वात कुख्यात दहशतवादी लादेन कुठे लपला याची माहिती पाकिस्तानला होती. त्यांनी न्यूयॉर्क टाईम्सच्या पत्रकार कार्लोटा गाल यांचे पुस्तक द राँग एनिमी या पुस्तकाचा दाखला दिला. पाकिस्तानी लष्कराच्या काही बड्या अधिकाऱ्यांना लादेन अबोटाबाद येथे लपल्याची माहिती होती. आपण त्या पुस्तकातील दाव्यांविषयी सहमत आहोत असे ट्रम्प यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.