आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका विकसनशील राष्ट्र, यापुढे भारत व चीनला आर्थिक अनुदान देणार नाही- ट्रम्‍प

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - शिकागो - भारत व चीनला यापुढे आर्थिक अनुदान दिले जाणार नाही. हे देश विकसनशील असल्याच्या नावाखाली अनुदानाचा लाभ घेतात. वेगाने आर्थिक विकास साधणाऱ्या देशांना निधीची मदत देणे वेडेपणा ठरेल, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. अमेरिका विकसित नव्हे, विकसनशील राष्ट्र असल्याचा दावाही त्यांनी केला.

 

अमेरिकेने इतर कोणत्याही देशांच्या तुलनेत वेगाने विकास करावा, असे मला वाटते. ते साध्य करायचे असल्यास वेगाने विकासाची वाटचाल करणाऱ्या देशांचे अनुदान थांबवावे लागणार आहे. नॉर्थ डकोटामध्ये निधी संकलनासंबंधी बैठकीत ट्रम्प यांनी हा मुद्दा मांडला. ट्रम्प म्हणाले, अमेरिका अनेक वर्षांपासून विकसनशील देशांचे संरक्षण करत आहे. हे देश आपले नशीब चमकवू लागले आहेत. त्यांचा सैन्य खर्च खूप कमी आहे. अमेरिकेचा लष्करी खर्च जगात सर्वाधिक आहे. जागतिक व्यापार संघटनेच्या चुकीच्या धोरणांमुळे चीन आर्थिक महासत्ता बनत चालला आहे. चीन दरवर्षी आपल्यापेक्षा ५०० अब्ज डॉलर कमावून स्वत:ला बळकट बनवत आहे.

 

अनेक वर्षांपासून नेत्यांनी पेरलेल्या असंतोषाचाच फायदा ट्रम्प घेताहेत : आेबामा
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा यांनी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मध्यावधी निवडणूक प्रचारासाठी अर्बाना येथील जाहीर सभेत शनिवारी सहभाग घेतला होता. त्यांनी या व्यासपीठावरून ट्रम्प यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, गत अनेक वर्षांपासून राजकीय नेत्यांनी असंतोष पेरण्याचे काम केले होते. त्याला हवा देण्याचा प्रयत्न ट्रम्प यांनी केला आहे. आता रिपब्लिकन पार्टीत आक्रोश व भीतीच्या राजकारणाला स्थान मिळाले आहे. नाझी विचाराविरोधातील झालेल्या क्रांतीप्रमाणेच आम्ही या भेदभावाच्या विरोधात आवाज उठवू, असा इशारा आेबामा यांनी दिला.


१९.१५ लाख कोटी चिनी आयातीवर कर लावणार
अमेरिका १९.१५ लाख कोटी रुपयांच्या चिनी आयातीवर कर लागू करणार आहे. अमेरिकेची चीनवरील ही सर्वात मोठी आर्थिक कारवाई ठरणार आहे. याअगोदर अमेरिकेने ३.५९ लाख कोटी रुपयांच्या चिनी आयात मालावर कर लागू केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला आहे. चीनसोबत अमेरिका व्यापारी असंतुलन कमी करण्याच्या प्रयत्नात आहे. व्यापारी असंतुलन कमी झाल्यास अमेरिकेत रोजगार निर्माण होईल. त्यातून महागाई वाढू शकते.

बातम्या आणखी आहेत...