आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Shocking Video: 60 फुट उंच ब्रिजवर थांबली होती तरुणी, मित्राने अचानक दिला धक्का!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हँकोवर - हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर सगळेच हैराण आहेत. मित्र-मंडळी एखाद्या नदीत पोहण्याची मजा घेत असताना अनेकवेळा भित्र्या मित्रांना नदीत ढकलून थट्टा मस्करी करत असतात. परंतु, या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तरुणीला तिच्या मित्राने चक्क 60 फुट उंच अशा एका ब्रिजवरून थेट नदीत फेकले. गंमत आणि मस्करीचा भाग म्हणून झालेल्या या वर्तनामुळे या तरुणीचा जीव धोक्यात टाकला. थेट 60 फुट खाली नदीत पडल्याने तिच्या फुफुसांना आणि बरगड्यांना इजा झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

 

एबीसी न्यूजच्या वृत्तानुसार, अमेरिकेतील व्हँकोवर परिसरात 16 वर्षीय तरुणी जॉर्डन हॉलगर्सन आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत फिरण्यासाठी गेली होती. त्याच ठिकाणी ती 60 फुट उंच ब्रिजवर थांबली असताना तिच्या एका मित्राने मागून अचानक धक्का दिला. ती सांगते, की "मी ब्रिजवर थांबले असताना सगळ्यांनी एकाचवेळी काउंटडाउन सुरू केले. मी त्यांना सांगत होते, की प्लीझ काउंटडाउन करू नका मी तयार नाही आणि उडी मारणार नाही. त्याचवेळी अचानक माझ्या एका फ्रेंडने मला धक्का दिला." या घटनेत जॉर्डनच्या बरगड्यांना मोठे नुकसान झाले असून पूर्णपणे बरे होण्यासाठी तिला किमान 2 ते 3 महिने लागतील. जॉर्डनच्या त्या मित्राने तिची माफी मागितली आहे. 

बातम्या आणखी आहेत...