Home | International | Other Country | US Infamous serial killer reveals what drove him to torture and murder 10 people

Serial Killer: 10 लोकांचे डोळे बाहेर काढून तळपून केला खून; अमेरिकेचा सर्वात कुप्रसिद्ध माथेफिरु म्हणाला, माझ्या शरीरात राक्षस घुसायचा...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 04, 2018, 12:02 PM IST

राक्षसानेच माझ्या हातून निष्पाप लोकांची हत्या करून घेतली. ज्यांना ठार मारले त्या सर्वांवर मला दया आली होती -डेनिस

 • US Infamous serial killer reveals what drove him to torture and murder 10 people

  वॉशिंग्टन - अमेरिकेतील कान्सास शहरात 10 जणांचे डोळे बाहेर काढून त्यांचा निर्घृण खून करणारा सर्वात कुख्यात माथेफिरु डेनिस रेडरने धक्कादायक खुलासे केले आहेत. इतक्या लोकांना एवढ्या अमानवीय पद्धतीने ठार मारलेच कसे असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. त्यावर रेडर म्हणाला, त्या लोकांवर त्याला दया सुद्धा आली होती. परंतु, जेव्हा अंगात राक्षसी आत्मा घुसतो तेव्हा त्याला काहीच वाटत नाही. लहानपणापासूनच आपल्या शरीरात राक्षसी आत्मा प्रवेश करायची आणि त्याच्या सांगण्यावरूनच आपण हे सगळे खून केले असे रेडर म्हणाला. उल्लेखनीय बाब म्हणजे, त्याने ज्या 10 जणांना विक्षिप्त करून ठार मारले त्यामध्ये 2 लहान मुलांचाही समावेश होता.


  इतक्या क्रूर पद्धतीने केल्या हत्या...
  1974 ते 1991 दरम्यान डेनिस रेडरने 10 लोकांचा अतिशय विभत्स पद्धतीने खून केला. या सर्वच हत्यांच्या पद्धती एकसारख्या होत्या. तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना यामागे सीरियल किलर असल्याचा संशय झाला. परंतु, त्या सायको किलरचा पत्ता त्यांना लावता येत नव्हता. 2005 मध्ये डेनिसला पोलिसांनी पकडले होते. डेनिस स्वतःला BTK अर्थात ब्लड, टॉर्चर, किलिंग असे संबोधतो. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने आपल्या कृत्यांची कबुली देखील दिली. परंतु, यामागचे कारण काय होते याचा खुलासा त्याने आता केला आहे. त्याचे खुलासे समोर आल्यानंतर अमेरिकन माध्यमांमध्ये खळबळ उडाली आहे.


  माझ्या राक्षसी आत्मा करायचा प्रवेश!
  एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये डेनिसने आपण सीरियल किलर कसे बनलो याचा खुलासा केला आहे. यात तो म्हणतो, "मी एक सामान्य माणूस होतो. अगदी सामान्य माणसांप्रमाणेच मी रोज चर्चला जात होतो आणि परिवाराचे भरण पोषण करत होतो. आपण मान्य करा अथवा नका, परंतु, माझ्या शरीरात एक राक्षसी आत्मा प्रवेश करायचा. मी अगदी लहान असतानाच ही प्रक्रिया सुरू झाली होती. त्याने माझ्यावर पूर्णपणे ताबा मिळवला होता. त्यानेच माझ्या हातून निष्पाप लोकांची हत्या करून घेतली. मी ज्या-ज्या लोकांना ठार मारले त्या सर्वांवर मला दया आली होती."


  8 वीला असताना झाला भुताटकी, पत्नीसह मुलांचाही खून
  डेनिस रेडरने आपल्या पत्नीसह दोन लहान मुलांचा सुद्धा खून केला. तो पुढे म्हणतो, की "मी आठवीला होतो. तेव्हापासूनच मला कळाले होते की मी राक्षसी वृत्तीचा आहे. माझ्या अंगात राक्षस प्रवेश करत होता. लहान असतानाच माझा राक्षसी जगाशी संबंध असल्याचे कळाले होते. काळ्या जगाचे माझ्यावर नियंत्रण होते."


  फ्लॉपी डिस्कने केली पोलिसांची दिशाभूल
  मीडिया रिपोर्ट्सनुसार, डेनिस हत्या करून पोलिसांनाही त्रास द्यायचा. त्याने एक फ्लॉपी डिस्कमध्ये हत्येशी संबंधित काही खुलासे केले होते. तसेच पोलिस त्याला पकडण्यात कसे अपयशी ठरले याचा उल्लेखही यात तो करत होता. काही अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तो त्यांना शिवीगाळ सुद्धा करायचा. याच फ्लॉपी डिस्कच्या माध्यमातून तो पोलिसांच्या हाती लागला.


  हत्या करण्यापूर्वी करायचा हे काम
  हत्या करण्यापूर्वी तो आपल्या शिकारला पकडून डांबून ठेवायचा. कित्येक दिवस त्यांना नरक यातना देत होता. यानंतर त्यांचे हात कापून, किंवा पाय कापून फोटोग्राफी करत होता. त्याने मारण्यापूर्वी प्रत्येक पीडिताला आंधळे केले होते. त्यावरूनच तो एक मानसिक रुग्ण असल्याचे पोलिसांनी वर्तवले होते.

Trending