आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका : न्यायाधीशांनी आरोपीला दिली शीख धर्मग्रंथ वाचण्याची शिक्षा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयाॅर्क - अमेरिकेतील ओरेगॉन प्रांतात मॅरियन काउंटीचे न्यायाधीश लिंडसे पॉर्टि्रज यांनी हल्ला केल्याप्रकरणातील दोषीला शीख धर्माचा अभ्यास करण्याची शिक्षा दिली आहे. दोषी अँड्रयू रामसे (२५) यास न्यायालयाने तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा दिली आहे. अमेरिकेतील “द शीख कोलिशन’ने ही माहिती दिली आहे. कोलिशनने एका निवेदनात म्हटले, रामसे यांनी १४ जानेवारीला हरविंदरसिंह डोड यांना धमकी व त्यांच्यावर हल्ला केल्याची कबुली दिली होती. द्वेषाच्या गुन्ह्याखाली शिक्षा देण्यात आली आहे. माध्यमांनी दिलेल्या अहवालानुसार, न्यायाधीशांनी रामसे यास दरवर्षी जून महिन्यात होणाऱ्या शीख समाजाच्या संचलनात सहभागी होण्यास सांगितले आहे. तसेच त्याने शिख समाजाविषयी व संस्कृतीविषयी कोणती माहिती मिळवली, हेसुद्धा त्याला न्यायालयात सांगायचे आहे, असे आदेशही  न्यायाधीशांनी दिले आहेत. रामसे यास ज्या व्यक्तीकडे  ओळखपत्र नाही, अशा  व्यक्तीस  सिगारेट विक्रीस डोड यांनी मनाई केली होती. त्यावरून चिडलेल्या रामसे याने हरविंदरसिंग डोड यांच्यावर हल्ला केला होता.