Home | Khabrein Jara Hat Ke | US Man saw his father kill his mother and show proofs for his arrest

पती-पत्नीत कोणत्यातरी कारणामुळे झाला वाद, नंतर घरातून अचानक गायब झाली पत्नी, 3 वर्षांचा मुलगा म्हणत होता- पप्पाने मम्मीला त्रास दिला, पण कोणीच ठेवला नाही विश्वास, 26 वर्षानंतर झाला खुलासा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 11, 2019, 06:57 PM IST

आता 26 वर्षानंतर मुलाने वडिलांना पाठवले तुरूंगात, आईला मिळवून दिला न्याय

 • US Man saw his father kill his mother and show proofs for his arrest


  फ्लोरिडा- अमेरिकेत एका व्यक्तीला आपल्या पत्नीच्या खूनाच्या 26 वर्षानंतर कोर्टाचा सामना करावा लागला. दोन दशकानंतर मुलाने आपल्या आईच्या खूनाचे पुरावे सादर केले. आईच्या खूनाच्या वेळेस मुलाचे वय फक्त 3 वर्षे होते आणि त्याच्यासमोरच त्याच्या आईला वडिलांनी मारले होते. त्याने त्यावेळी अनेकांना हे सांगण्याचा प्रयत्न केला पण कोणालाच त्याचे म्हणने समजू शकले नाही. आता त्याने 26 वर्षानंतर जुन्या घरात खोदकाम करून आपल्या आईचा मृतदेहाचे पुरावे सादर केले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी वडिलांना ताब्यात घेतले.


  3 वर्षीय मुलावर बसला नाही विश्वास
  - फ्लोरिडात राहणाऱ्या 29 वर्षीय एरन फ्रेजर 3 वर्षांचा होता, जेव्हा अचानक त्याची आई बेपत्ता झाली. तपास करायला आलेल्या पोलिसांना तो सांगण्याचा प्रयत्न करत होता की, पप्पानेच आईला मारले, पण कोणीच त्याचे म्हणने समजू शकले नाही.
  - इतक झाल्यानंतर एरनला दुसऱ्या एका कुटुंबाने दत्तक घेतले, पण त्याच्या आईचा काहीच पत्ता लागला नाही. पण मुलाने दोन दशकानंतर पुरावे शोधून काढले.


  मुलाने वडिलांना पाठवले तुरूंगात
  - एरन जेव्हा मोठा झाला तेव्हा त्याने पुरावे शोधून काढण्याचा निर्णय घेतला. अंदाजे चार वर्षांपूर्वी त्याने आपल्या नातलगासोबत मिळून त्याचा जुन्या घरात खोदकाम केले.
  - तिथे त्याला त्याच्या आईचे अवशेष मिळाले, डिएनए टेस्ट केल्यावर समोर आले की, ती त्याची आईच होती.
  - त्यानंतर 2015 ला पोलिसांनी एरनचे खरे वडील मायकल हेमला ताब्यात घेतले. त्याला पत्नी बोनी हेमत्या मर्डरमध्ये दोषी ठरवण्यात आले.

 • US Man saw his father kill his mother and show proofs for his arrest
 • US Man saw his father kill his mother and show proofs for his arrest
 • US Man saw his father kill his mother and show proofs for his arrest
 • US Man saw his father kill his mother and show proofs for his arrest

Trending