Home | International | Other Country | US Man won lottery worth 273 million dollars on tickets he lost

अमेरिकेतील तरुणाने जिंकले 2 हजार कोटी रुपये 

वृत्तसंस्था | Update - Mar 16, 2019, 12:03 AM IST

दैवयोग : लॉटरी तिकीट हरवले होते परंतु पुन्हा मिळाले आणि नशिबाचे दरवाजे उघडले...

  • US Man won lottery worth 273 million dollars on tickets he lost

    वाॅशिंग्टन - अमेरिकेतील न्यू जर्सी भागात एका तरुणास तब्बल २७ कोटी डॉलरची (सुमारे २ हजार कोटी रुपये) लॉटरी लागली. दैवयोग पाहा, त्याचे हे तिकीट हरवले होते. त्याला एका अज्ञात व्यक्तीने परत आणून दिले होते. गेल्या १५ वर्षांंपासून मायकल जे वियरस्की नावाचा तरुण बेरोजगारी सहन करत होता. त्याने एका दुकानातून लॉटरीची दोन तिकिटे विकत घेतली. तिकीट विकत घेत असताना तो फोनवर कोणाशी तरी बोलत होता. त्याच गडबडीत त्याने लॉटरीचे पैसे दिले आणि तिकीट न घेताच निघून गेला.


    घरी जाऊन पाहिले तेव्हा त्याच्या खिशात तिकीट नव्हते. त्याने खूप शोधाशोध केली. तिकीट सापडले नाही. शेवटचा प्रयत्न म्हणून तो त्या दुकानात गेला. तेव्हा समजले की, एका अनोळखी व्यक्तीला काउंटरवरच तिकिटे सापडली होती. ती त्याने दुकान मालकाकडे नेऊन दिली होती. दुकानदाराने मायकलची चौकशी केली आणि खात्री पटल्यानंतरच ती तिकिटे परत केली. विशेष म्हणजे, ज्या दिवशी त्याला तिकिटे सापडली त्याच दिवशी त्या तिकिटाची सोडत होती. त्याला खूप हायसे वाटले.


    मायकलला तिकिटाची सोडत निघाल्यानंतर लॉटरी लागल्याची माहिती मिळालेली नव्हती. त्याच्या आईच्या मित्राने लॉटरी लागल्याची माहिती दिली. मायकलने तिकीट स्क्रॅच करून पाहिले आणि त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. मायकल म्हणाला, गेल्या १५ वर्षांपासून बेरोजगार होतो. माझी माजी पत्नी मला पैसे देत असे. बक्षीस लागल्याचा खूप आनंद वाटतो.

Trending