Home | International | Other Country | us military scraps 300 million dollar in aid to pakistan

US ने पाकिस्तानला दिला जाणारा 2130 कोटींचा निधी केला रद्द; म्हणाले, Pak अजुनही दहशतवाद्यांचे नंदनवन

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 02, 2018, 03:44 PM IST

अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवाद विरोधात दिला जाणारा 30 कोटी अमेरिकन डॉलरचा निधी (2130 कोटी रुपये) निधी रद्द केला.

  • us military scraps 300 million dollar in aid to pakistan

    वॉशिंग्टन - अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवाद विरोधात दिला जाणारा 30 कोटी अमेरिकन डॉलरचा निधी (2130 कोटी रुपये) निधी रद्द केला आहे. पाकिस्तान अजुनही दहशतवाद्यांचे नंदनवन आहे. त्यांनी दहशतवाद विरोधात योग्य ती कारवाई केलेली नाही त्यामुळे हा निधी थांबवला जात आहे असे ट्रम्प प्रशासनाने स्पष्ट केले. पाकिस्तानला दिल्या जाणाऱ्या या निधीवर जानेवारी महिन्यातच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली होती. पाकिस्तानने दहशतवाद्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली नाही. तसेच कारवाईच्या नावे हा आदेश सातत्याने खोटे बोलत आहे असेही ट्रम्प यांनी खडसावले होते.


    ट्रम्प प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे, गेल्या 17 वर्षांत अफगाणिस्तानमध्ये तालिबान विरोधात अमेरिकेच्या नेतृत्वाचे सैनिक युद्ध लढत आहेत. त्यात पाकिस्तान याच दहशतवाद्यांना आश्रय देत आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री जेम्स मॅटिस म्हणाले होते, की पाकिस्तानने दहशतवाद विरोधात कठोर कारवाई केली नाही तर त्यांचा 30 कोटी अमेरिकन डॉलरचा निधी रद्द केला जाईल. त्यावरूनच हा निर्णय घेण्यात आला असे सांगितले जात आहे.


    पाकला मिळालेच नाहीत 5680 कोटी रुपये
    अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटागॉनचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल क्रोन फॉकनर यांनी सांगितले, कि या वर्षाच्या सुरुवातीला पाकिस्तानला दिला जाणारा 50 कोटी अमेरिकन डॉलरचा निधी रद्द करण्यात आला. एकूणच अमेरिकेने आतापर्यंत पाकिस्तानला दिला जाणारा 5680 कोटी रुपयांचा मदत निधी रद्द केला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, याच महिन्यात अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पियो आणि त्यांचे लष्करी अधिकारी एका शिष्टमंडळासह पाकिस्तान दौऱ्यावर जात आहेत. अशात या भेटीत सुद्धा चर्चेचा मूळ मुद्दा दहशतवाद विरोधी कारवाया राहणार असे सांगितले जात आहे.

Trending