• Home
  • Sports
  • US Open| Canadian teenager Andreescu defeats S. Williams to win US Open title

यूएस ओपन / US Open : कॅनडाच्या 19 वर्षीय बियांसा आंद्रेस्कूने पटकवला खिताब; 23 वेळा गतविजेत्या असलेल्या सेरेनाला केले पराभूत

US Open स्पर्धेत पदार्पणातच किताब पटकावणारी पहिली महिला ठरली बियांसा 

Sep 17,2019 02:05:49 PM IST

न्यूयॉर्क - कॅनडाच्या 19 वर्षीय बियांसा आंद्रेस्कूने अमेरिकेच्या सेरेना विलियम्सचा पराभव करत आपला पहिला US Opne चा खिताब पटकावला. शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात आंद्रेस्कूने सेरेनाचा 6-3, 7-5 अशा सरळ सेटने पराभव केला. हा सामना एक तास 40 मिनिटे चालला होता. सेरेनाच्या या पराभवासोबत तिचे 24 वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचे स्वप्न मोडले. सेरेनेला सलग दुसऱ्यांदा अमेरिकी ओपनमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. गेल्या वर्षी जपानच्या नाओमी ओसाकाने सेरेनाचा पराभव केला होता.


बियांसा यूस ओपन स्पर्धेत पदार्पणात किताब जिंकणारी पहिला महिला ठरली आहे. 1968 मध्ये या स्पर्धेची सुरुवात झाली होती. बियांसाने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत चार मोठ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे.

विजेतेपदानंतर बियांसाची प्रतिक्रिया
विजेतेपद पटकावल्यानंतर बियांसाने सांगतिले की, ''अंतिम सामन्या सेरेनेसोबत लढत असल्यामुळे सामन्यापूर्वी माझ्या मनात असंख्य विचार येत होते. मी जागे राहावे यासाठी सामन्यादरम्यान श्वास घेण्याचा प्रयत्न करत होते.''


मी आणखी चांगले प्रदर्शन करु शकले असते - सेरेना
सामना संपल्यानंतर सेरेनाने सांगितले की, 'हा एक शानदार सामना होता. मी फक्त माझ्या पॉइंटवर खेळत होते. मी आणखी चांगल्याप्रकारे खेळू शकते असे मला प्रत्येकवेळी वाटत होते. बियांसा सुद्धा उत्तमप्रकारे खेळली. या स्तरावर चांगला खेळ दाखवल्यामुळे मी स्वतःला सन्मानित असल्याचे जाणवते.' संपूर्ण सामन्यात विलियम्सने 33 तर बियांसाने फक्त 17 चुका केल्या.

X