यूएस ओपन / यूएस ओपन : नदाल ४ ग्रँडस्लॅममध्ये ५ पेक्षा अधिक वेळा फायनल खेळणारा दुसरा खेळाडू

नदालचा ही २७ वी ग्रँडस्लॅम फायनल; दुसरीकडे मेदवेदेवची पहिली फायनल

वृत्तसंस्था

Sep 17,2019 02:05:12 PM IST

न्यूयॉर्क - यूएस ओपनमध्ये पुरुष एकेरीत फायनलमध्ये स्पेनचा राफेल नदाल आणि रशियाचा डेनियल मेदवेदेव भिडतील. जगातील नंबर २ टेनिसपटू नदाल पाचव्यांदा यूएस ओपनच्या फायनलमध्ये पोहोचला. तो चारही टेनिस ग्रँडस्लॅमच्या फायनलमध्ये ५ किंवा त्यापेक्षा अधिक वेळा पोहोचणारा जगातील दुसरा खेळाडू ठरला. यापूर्वी अशी कामगिरी स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने केली आहे. पाचव्या मानांकित मेदवेदेवचा पहिला ग्रँडस्लॅम फायनल आहे. गेल्या महिन्यात रॉजर्स कपच्या फायनलमध्ये नदालने मेदवेदेवला सरळ सेटमध्ये हरवले होते. ही नदाल व मेदवेदेव यांच्यातील केवळ दुसरी लढत असेल.


३३ वर्षीय नदालने उपांत्य फेरीत इटलीच्या मातेओ बेरितीनला ७-६, ६-४, ६-१ ने हरवले. हा दोघांतील पहिला सामना होता. दुसरीकडे, इतर उपांत्य फेरीत २३ वर्षीय मेदवेदेवने बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोवला ७-६, ६-४, ६-३ ने मात दिली. जर नदाल जिंकला तर तो सर्वाधिक २० ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या रॉजर फेडररशी बरोबरी करण्यापासून एक किताब दूर राहील.

नदाल सर्वाधिक फायनल खेळण्यात दुसऱ्या स्थानी

नदालचा हा २७ व्या ग्रँडस्लॅम फायनल आहे. सर्वाधिक ग्रँडस्लॅम खेळण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या स्थानी पोहोचला. फेडररने ३१ फायनल खेळले. त्याने ७ आॅस्ट्रेलियन ओपन, ५ फ्रेंच ओपन, १२ विम्बंलडन, ७ यूएस ओपन फायनल खेळले. दुसरीकडे नदालने ५ ऑस्ट्रेलियन ओपन, १२ फ्रेंच ओपन, ५ विम्बंलडन आणि ५ यूएस ओपन फायनल खेळले.

रशियन मेदवेदेव १४ वर्षांनी ग्रँडस्लॅम फायनलमध्ये

मेदवेदेव कोणत्याही ग्रँडस्लॅमच्या २००५ नंतर व यूएस ओपनच्या २००० नंतर फायनलमध्ये पोहोचणारा पहिला रशियन खेळाडू ठरला. तेव्हा मरात साफिनने अनुक्रमे ऑस्ट्रेलियन ओपन आणि यूएस ओपन जिंकला होता.

X
COMMENT