आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूएस ओपन : सेरेनाची दहावी फायनल; अशी कामगिरी करणारी पहिली महिला, आंद्रेस्कूशी लढत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - वर्षातील अखेरच्या ग्रँडस्लॅम यूएस ओपनमध्ये महिला एकेरीच्या फायनलमध्ये ३७ वर्षीय सेरेना विलियम्स आणि १९ वर्षीय बियांका आंद्रेस्कू यांच्यात होईल. ६ वेळेची माजी चॅम्पियन सेरेना दहाव्यांदा या स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहाचेली, दुसरीकडे आंद्रेस्कू पहिल्या काेणत्या ग्रँडस्लॅमची फायनल खेळेल. ती पहिल्यांदा यूएस ओपनच्या मुख्य फेरीत खेळत आहे. सेरेना सर्वाधिक वेळा फायनलमध्ये पोहोचलेली जगातील पहिली खेळाडू बनली. 

अमेरिकन सेरेना १९९९ मध्ये पहिल्या चॅम्पियन बनली. त्या वेळी कॅनडाची आंद्रेस्कूचा जन्म देखील झाला नव्हता. आंद्रेस्कू जून २००० मध्ये जन्मली. २३ ग्रॅड स्लॅम चॅम्पियन सेरेनाने हा किताब जिंकल्यास ती सर्वाधिक २४ ग्रँड स्लॅम जिंकणाच्या बाबतीत मार्गारेट कोर्टशी बरोबरी करेल. आंद्रेस्कू कोणत्याही ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचणारी कॅनडाची दुसरी खेळाडू बनली. यापूर्वी, यूजनी बुकार्ड २०१४ मध्ये विम्बल्डनमध्ये फायनल खेळली. आंद्रेस्कूने या स्पर्धेचा किताब मिळवल्यास, ती ग्रँड स्लॅम जिंकणारी कॅनडाची पहिली खेळाडू बनेल. आंद्रेस्कू आणि सेरेना गेल्या महिन्यात रॉजर्स कपमध्ये देखील समोरासमोर आल्या होत्या. मात्र, त्या सामन्यात सेरेना पाठीच्या दुखापतीमुळे खेळू शकली नव्हती. दोघींना एकमेकींचा खेळ माहिती नाही. 
 

सेरेनाने पाचव्यांदा स्वितोलिनाला हरवले; २०१७ नंतर ग्रँडस्लॅम जिंकला नाही
आठव्या मानांकित सेरेनाने पाचव्या मानांकित एलिना स्वितोलिनाला ६-३, ६-१ ने  हरवले. सेरेना केवळ ७० मिनिटात विजयी झाली. सेरेना आणि युक्रेनच्या स्वितोलिना यांच्यातील सहावी लढत होती. सेरेनाने पाचव्यांदा विजय मिळवला. या दोघींत रिअो ऑलिम्पिक २०१६ नंतर पहिला सामना झाला. रिअोमध्ये स्वितोलिनाने सेरेनाला मात दिली होती. सेरेना गेल्या वर्षी देखील फायनलमध्ये पोहोचली होती. मात्र, नाओमी ओसाकाकडून पराभूत झाली होती. सेरेनाने अखेरचा ग्रँडस्लॅम २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन जिंकला. त्यानंतर २ ग्रँडस्लॅमच्या (२०१८ विम्बल्डन व यूएस ओपन) फायनलमध्ये पोहोचली. सेरेनाने ३४ विनर्स व स्वितोलिनाने ११ विनर्स मारले. 
 

आंद्रेस्कू चौथ्यांदा ग्रँडस्लॅममध्ये खेळतेय 
१५ व्या मानांकित आंद्रेस्कूने स्वित्झर्लंडच्या बेलिंडा बेनकिचला ७-६, ७-५ ने मात दिली. आंद्रेस्कूने बेनकिचला दोन तास १२ मिनिटात हरवले. ती चौथ्यांदा कोणत्या ग्रँडस्लॅममध्ये खेळत आहे. तिने चारही ग्रँडस्लॅम एक-एक वेळ खेळला. ती पहिल्यांदा यूएस ओपनमध्ये खेळताना फायनलमध्ये प्रवेश केला. आंद्रेस्कूने दोन्ही सेट टायब्रेकरमध्ये जिंकले. बातम्या आणखी आहेत...