आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • US, People Over 50 Years Of Age Playing Video Games Grew 30% In 3 Years, Here 28% Of The Total Gamers Of The Same Age

अमेरिकेत व्हिडिओ गेम खेळणारी पन्नाशीतील संख्या तीन वर्षांत ३०% ने वाढली, देशात याच वयाचे २८% गेमर्स!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
88 वर्षीय ऑड्रे बुकानन - Divya Marathi
88 वर्षीय ऑड्रे बुकानन
  • मुलांसोबत वेळ घालवण्यासाठी ज्येष्ठांनी व्हिडिओ गेमला माध्यम केले

वॉशिंग्टन- अमेरिकेतील अॅरिझोनामध्ये राहणाऱ्या ८८ वर्षांच्या ऑड्रे बुकानन दिवसाची सुरुवात स्वयंपाकगृहात करतात. सकाळी उठून किचनमध्ये त्या आपल्यासाठी मोठ्या बाऊलमध्ये नाष्टा बनवतात. या वेळी त्यांच्या हातात निंटेन्डो ३ डीएस एक्सएल असते. ही एक गेमिंग यंत्रणा आहे, जी तुम्ही आता धरून खेळू शकता. जोपर्यंत नाष्टा तयार होतो, ऑड्रे व्हिडिओ गेम खेळणे सुरू करतात. अॅनिमल क्रॉसिंग त्यांचा आवडता गेम आहे, जो खेळताना त्यांनी आतापर्यंत ३ हजार ५०० तास घालवले आहेत. विशेष म्हणजे यादरम्यान त्या दुसऱ्या शहरात राहणाऱ्या त्यांच्या नातवाला आपल्यासोबत करून घेतात आणि दोघे मिळून गेम खेळतात.

ऑड्रे अशा एकट्या नाहीत. अमेरिकेत त्यांच्यासारख्या पन्नाशी ओलांडलेल्यांची संख्या दिवसेंंदिवस वाढत आहे. ज्येष्ठांसाठी काम करणारी जागतिक संघटना एएआरपी फाउंडेशनच्या माहितीनुसार अमेरिकेत ३ वर्षांत अशा लोकांची लोकांची संख्या वाढून ५ कोटींच्या पुढे गेली आहे. फाउंडेशनच्या अहवालानुसार २०१६ मध्ये अमेरिकेत ५० वर्षांपेक्षा जास्त वयाचे सुमारे ४ कोटी लोक होते. जे आता ५.२ कोटीपेक्षा जास्त झाले आहेत.

अमेरिकेच्या लोकसंख्येत ५० पेक्षा जास्त वयाच्या लोकांची संख्या ३५% आहे. मात्र, व्हिडिओ गेम्स खेळणाऱ्यांमध्ये त्यांचा हिस्सा सुमारे २८% झाला आहे. या वयाच्या काही लोकांसाठी व्हिडिओ गेमचा अर्थ स्टारडम आहे, ज्यात त्यांना त्यांचे लक्ष्य प्राप्त केल्यावर स्टार झाल्यासारखे वाटते. दोन मुलांचे पिता ब्रायन सेलर्स ग्रेट सांगतात की, मी वयस्कर लोक आणि १२ वर्षांच्या मुलांमध्ये गेम खेळतांना होणाऱ्या वादविवादाची कल्पना करू शकतो.

८८ वर्षांच्या ऑड्रे यांनी अॅनिमल गेम खेळण्यात घालवले ३५०० तास व्हिडिओ गेम खेळणाऱ्या ज्येष्ठांची संख्याच नव्हे, तर त्यावरील त्यांचा खर्चही वाढला आहे. गेम्स, कंसाेल, अॅसेसरीजवर त्यांचा खर्च ३ वर्षांत ६ पट वाढला आहे. २०१८ मध्ये जानेवारी ते जूनदरम्यान या वयाच्या लोकांनी व्हिडिओ गेम्स आणि अॅसेसरीजवर सुमारे २४ हजार ५०० कोटी रुपये खर्च केले. २०१६ मध्ये याच कालावधीत या गोष्टींवर सुमारे ३ हजार ६४० कोटी रुपये खर्च केले होते. अमेरिकेत आजी-आजोबांची ही सवय सामाजिक समस्या निर्माण करणारी ठरली आहे.