आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सीएटल - जगात अनेक गूढ व्यक्तिमत्त्वे आहेत. पण डीबी कूपर नावाचा व्यक्ती म्हणजे असे रहस्य आहे जे समजण्यासाठी पोलिस आणि तपास संस्थांनी 48 वर्षे खर्च केली आहेत. 1971 मध्ये डीबी कूपर नावाच्या व्यक्तीने अमेरिकेच्या सुरक्षेला ठेंगा दाखवत एक उडणाऱ्या प्लेमनमध्ये 2 लाख डॉलरची लूट केली होती. त्यानंतर तो विमानातूनच गायब झाला होता. अनेक वर्षांपासून आजही पोलिस त्याचा शोध घेतल आहेत. त्यामुळेच त्याला इतिहासाचील सर्वात गूढ व्यक्ती म्हटले जाते.
अशी होती घटना..
- ही घटना 24 नोव्हेंबर 1971 ची आहे. डीबी कूपर नियोजनासह अमेरिकेच्या एअरपोर्टवर गेला. रोजच्या प्रमाणेच सर्व वातावरण होते. हातात काळी बॅग आणि काळा कोट परिधान केलेला कूपर तिकिट काऊंटरकडे गेला.
- त्याने 20 डॉलर देऊन काऊंटरवरून फ्लाइटचे तिकिट खरेदी केले. त्याठिकामी त्याने 'डैन कूपर' (Dan Cooper) असे नाव सांगितले. हे त्याचे खरे नाव नव्हते. त्याने सीएटलला जाणाऱ्या विमानाचे तिकिट घेतले आणि निघाला.
तेव्हा नसायची चेकिंग
तिकिट घेऊन कूपर थेट विमानाकडे गेला. एअरहोस्टेसला तिकिट दाखवून तो बोइंग 727 मध्ये बसला. त्या काळात अमेरिकेच्या एअरपोर्ट्सवर आतासारखी सुरक्षेची व्यवस्था नव्हती. कूपरला विमानत सर्वात मागे जागा मिळाली होती. ती त्याच्यासाठी आणखी उत्तम होती.
एअरहोस्टेसला दिले लेटर
कूपरने इतर पॅसेंजर्सप्रमाणे त्याचे सामान लॉफ्टमध्ये न ठेवता त्याच्या जवळ ठेवले. पोर्टलंड ते सीएटलचे अंतर फक्त 30 मिनिटांचे होते. त्यामुळे कूपरने वेळ न दवडता कामाला सुरुवात केली. त्याने जवळ बसलेल्या एका एअरहोस्टेसला एक लेटर दिले. तिला वाटले कूपर बिझनेसमन आहे आणि तो तिच्याशी फ्लर्ट करत आहे. पण पत्र वाचताच तिला धक्का बसला. त्यात लिहिले होते, माझ्याकडे बॉम्ब आहे, प्लीज माझ्याजवळ येऊन बस आणि मी सांगतो तसे कर. ते वाचताच तिचे डोके सुन्न झाले. तिचे सोबतच्या अटेन्डंटला हे सर्व सांगितले दोघी कूपरकडे आल्या. कूपरने काळ्या रंगाची बॅग उघडूत दाखवली त्यात बॉम्ब होता.
अटेंडंटला सांगितल्या सर्व अटी
कूपरने अटेंडंटला सर्व अटी सांगितल्या. तो म्हणाला की, विमान जवळच्या एअरपोर्टवर लँड करून त्यात पुन्हा इंधन भरायचे. तसेच त्याने दोन लाख डॉलर्स आणि चार पॅराशूटही मागवले. अटेंडंट थेट पायलटकडे गेली आणि त्याला सर्व सांगितले. पायलटला समजले की, प्रवाशांचा जीव धोक्यात आले. त्यामुळे त्याने सिएटल एअर ट्राफिक कंट्रोलला सर्वकाही सांगत लँडिंगची तयारी केली..
पुढे वाचा.. जेव्हा लँड होऊ लागले विमान...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.