आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्या घरात तर नाही ना असा 'दगड!' 30 वर्षांपासून घरात पडलेली वस्तू निघाली उल्कापिंड, झटक्यात मिळाले 74 लाख रुपये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंगटन - अमेरिकेतील मिशिगन प्रांतात राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरात 30 वर्षांपासून एक दगड ठेवलेले होते. या दगडाचा वापर ते दार अडवण्यासाठी करत होते. आता 3 दशकानंतर ती गोष्ट प्रत्यक्षात एक उल्कापिंड असल्याचे समोर आले आहे. 10 किलो वजन असलेल्या या उल्कापिंडाची किंमत 1 लाख अमेरिकन डॉलर अर्थात 74 लाख रुपये असल्याचा अंदाज लावण्यात आला आहे. 1988 मध्ये त्या व्यक्तीने एक घर खरेदी केले होते. त्याच घरात जुन्या मालकाच्या इतर वस्तूंसोबत हे उल्कापिंड होते. 


असा लागला शोध
उल्कापिंडच्या जुन्या मालकाने सांगितल्याप्रमाणे, 1930 च्या दशकात शेतात खोदकाम करताना त्यांना एक दगड सापडला होता. हे दगड गरम होते. काहीसा वेगळा दिसल्याने त्याने तो दगड आपल्या घरातील अंगणात आणून ठेवला होता. नवीन मालकाने सांगितले, की घर खरेदी केल्यानंतर दार उघडे ठेवण्यासाठी एक दगड शोधला. त्यावेळी अंगणात ही गोष्ट दिसून आली. गेल्या 30 वर्षांपासून त्याचा असाच वापर सुरू होते. एक दिवस सहज या दगडाची किंमत काय असेल असा विचार आला आणि रिसर्च केले तेव्हा त्यांना धक्काच बसला. 

 

का आहे इतके महाग?
संबंधित व्यक्तीने हा दगड मिशिगन विद्यापीठात दाखवण्यासाठी नेला. तेथील जीवशास्त्र तज्ञ प्रोफेसर मोनालिसा सर्बेस्कू यांनी त्याची चाचणी घेतली. एक्सरे केल्यानंतर त्यामध्ये 88% लोह, 12% निकेल तसेच काही प्रमाणात इरीडिअम, गॅलियम आणि सोने देखील सापडले. मोनालिसा यांनी दगडाचा एक भाग चाचणीसाठी वॉशिंगटन येथील स्मिथसोनियन इंस्टीट्यूटकडे पाठवला. त्याच ठिकाणी हा धातू उल्कापिंड असल्याचा खुलासा झाला. आकाशातून जमीनीवर पडणारे उल्कापिंड प्रामुख्याने लोखंडी असतात. त्यांची बाजारात तेवढी किंमत राहत नाही. परंतु, मिशिगनच्या व्यक्तीला सापडलेले उल्कापिंड सोने आणि इतर खनिजांमुळे महाग आहे. हे उल्कापिंड मिशिगनपासून 48 किमी दूर एडमोर येथील माउंट प्लीसेंट येथे एका शेतकऱ्याला विकला होता. याच ठिकाणी एका शेतात ते पडले होते. त्यामुळे उल्कापिंडला एडमोर असे नाव देण्यात आले आहे. 

बातम्या आणखी आहेत...