आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेतील शाळा सुरक्षेवर करतात 19 हजार कोटी खर्च, सामूहिक हत्याकांडाचा परिणाम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलिसा चान


अमेरिकेत २०१९ मध्ये सामूहिक हत्याकांडाच्या घटनांमध्ये अनेक लोकांच्या मृत्यूनंतर, नागरिक मोठ्या प्रमाणात सुरक्षेचा उपाय अवलंबत आहेत. अनेक मुख्य दुकानांमध्ये दुहेरी कवच असलेल्या बॅकपॅकची विक्री करण्यात येत आहे. मुलांसाठी बुलेटप्रूफ हुडीची मागणी वाढली आहे. हल्लेखोरांपासून शाळेमधील वर्गाचे संरक्षण करण्यासाठी पांढरा सुरक्षा बोर्ड तसेच मजबूत खिडक्या आणि दरवाजे बसवण्यात येत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेने चालणारे स्मार्ट कॅमेरे बसवण्यात आले आहेत. फ्रूटपोर्ट, मिशिगन मधील महाविद्यालयांमध्ये सुरक्षेसाठी ३४२ कोटी खर्च करण्यात आले आहेत. हल्लेखोरांपासून बचाव करण्यासाठी, विशेष पद्धतीने दरवाजे आणि खिडक्या बसवण्यात आल्या आहेत. बुलेट प्रूफ खिडक्यांसह विशेष लॉकिंग यंत्रणा असणार आहे.

मार्केट कन्सल्टिंग फर्म आयएचएसनुसार, २०१७ मध्ये अमेरिकेतील शाळांनी सुरक्षा व्यवस्थेवर १९ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. २०१४ मध्ये ही आकडेवारी ५४७५ कोटी एवढी होती. गोळीबारापासून बचाव करणाऱ्या उत्पादनांपासून, हल्ल्यामध्ये विद्यार्थी सुरक्षित असल्याची कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही. टाईमने सुरक्षा क्षेत्रातील अनेक लोकांसोबत संवाद साधला असता, त्यांनीही याबद्दल कुठलीही माहिती दिलेली नाही. तर, केवळ पैसा कमावण्याच्या हेतूनेच, काहीजण सुरक्षा व्यवस्थेचा फायदा घेत असल्याचे उद्योग समीक्षकांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे बॅकपॅक आणि हुडीसह अनेक बुलेट प्रूफ उत्पादने केवळ हँडगनपासूनच बचाव करतात. अॅसॉल्ट रायफल सारख्या हत्यारांपासून हे बचाव करत नाहीत.

सुरक्षारक्षक उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या केवळ आई-वडिलांच्या भीतीचा फायदा उठवत असल्याची टीका, बंदूक नियंत्रणाचे समर्थन करणाऱ्या ग्रुप मॉम्स डिमांड अॅक्शनच्या संस्थापक शेनन वॉट्स यांनी केली आहे. अनेक संघटना बंदूक वापरावर नियंत्रण आणण्याची मागणी करत आहेत. परंतु, अमेरिकेतील संसदेच्या दुसऱ्या सभागृहात या विधेयकावर चर्चा झालेली नाही. या विधेयकामध्ये बंदुकींची खासगी विक्री रोखण्याची मागणी केलेली आहे. ऑगस्टमध्ये एल पासो व डेटन हत्याकांडानंतर बुलेट प्रूफ उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या विक्रीत ५०० % वाढ झालेली आहे. टफी पॅक कंपनीच्या बॅकपॅकवर असणाऱ्या शील्डची किंमत ९००० रुपये आहे. गार्ड डॉग सेक्युरिटीच्या तीन किलो वजनाच्या बुलेट प्रूफ जॅकेटची किंमत २१ हजार रुपये आहे. सुरक्षा उत्पादनांची मागणी लक्षात घेऊन, व्ही ट्रान यांनी नोकरीचा राजीनामा देऊन, घरातच हुडी विकण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. २०१७ मध्ये अॅथेना सेक्युरिटीने एक स्मार्ट कॅमेरा सिस्टिम बाजारात आणली आहे.

या वर्षात ३८० पेक्षा जास्त सामूहिक हत्याकांडाच्या घटना
अमेरिकेत आतापर्यंत ३८० पेक्षा जास्त सामूहिक हत्याकांडांच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. ऑगस्ट महिन्यात एल.पासो.टेक्सास, डेटन आणि ओहायो येथील घटनांमध्ये ३१ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. गिलरॉय, कॅलिफोर्निया, ओडेसा आणि टेक्सासमध्ये हल्ल्यांत १० नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

(टाइम मासिक व टाइम मासिक लोगो Time Inc.चे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहेत. याचा वापर परवानगी घेऊन केला आहे.)

बातम्या आणखी आहेत...