शोध / अमेरिकेतील शोधकर्त्यांना सापडले 140 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेली दोन जहाज, 10 वर्षांपासून सुरू होता शोध

अमेरिकेतील मिशिगनच्या उत्तर दिशेकडील समुद्रात 200 फुट खाली मिळाले जहाज

Sep 22,2019 04:16:00 PM IST

लांसिंग- अमेरिकेतील मिशिगनच्या उत्तर दिशेकडील समुद्रात 140 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेले दोन जहाज सापडले आहेत. या जहाजांचा शोध 10 वर्षांपासून सुरू होता. याबद्दलची माहिती या जहाजाला शोधणारे पाणबुडे आणि समुद्र इतिहासकार बर्नी हेलस्ट्रॉमने दिली. त्यांनी सांगितले की, दोन्ही जहाज समुद्रात 200 फुट खोल आढळले. हे जहाज पूर्णपणे सडून गेले असून, आता फक्त जहाजाचे सांगाडे राहीले आहेत.


त्यांनी सांगितले की, जहाज 1878 मध्ये बेपत्ता जाले होते. या जहाजांची नावे "पेशेटिगो" आणि "सेंट अँड्रयूज" आहेत. ज्या वेळेस हे दोन जहाज बेपत्ता झाली, तेव्हा यात कॅप्टनसहित दोन-दोन क्रू मेंबर होते. हेलस्ट्रॉम यांनी सांगितल्यानुसार, जहाजाला शोधण्यासाठी त्यांनी अनेक पाणबुड्यांची मदत घेतली. अखेर हे जहाज सापडले.

जहाज कोळसा घेऊन जाण्याचे काम करायचे

बर्नी हेलस्ट्रॉमने सांगितले की, पेशेटिगो 161 फूट लांब आणि सेंट एंड्रयूज 143 फूट लांब होते. या जहाजांचा वापर कोळसा घेऊन जाण्यासाठी व्हायचा. एखाद्या मोठ्या दगडाला टक्कर लागल्याने जहाज बुडाले असल्याचा अंदाज आहे.

X