आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Indo-US: अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ भारतात; पंतप्रधान मोदींसह परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ भारत दौऱ्यावर आहेत. त्यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकरन यांची भेट घेतली. जपानमध्ये होणाऱ्या जी-20 शिखर संमेलनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी ते भारतात पोहोचले. यात रशियासोबत होणाऱ्या भारताच्या ए-400 मिसाईल कराराचा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे. या दौऱ्यात रशियन रणगाडे भारतात आणण्यावरून अमेरिकेचा अडथळा दूर होईल अशी चिन्हे आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, 28 आणि 29 जून रोजी पीएम मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होणार आहे. त्यामुळे, पॉम्पियो यांचा हा भारत दौरा अतिशय महत्वाचा मानला जात आहे.


सरकारी सुत्रांच्या माहितीनुसार, पॉम्पिओ यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचीही भेट घेतली. या दोघांनी दहशतवाद, राष्ट्रीय सुरक्षेसह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. रशियाकडून भारताने एस-400 क्षेपणास्त्रे खरेदी करण्याचा करार केला होता. त्यावर अमेरिकेचा आक्षेप आहे. अमेरिकेने यापूर्वीच या करारावर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. भारताने आपले शस्त्रास्त्र करार आणि व्यवहार अमेरिकेसोबतच ठेवावे असा अमेरिकेचा आग्रह असतो. असल्याची चर्चा आहे. परंतु, पॉम्पिओ यांच्या भारत दौऱ्यातून अमेरिकेचा तो अडथळा दूर होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.


गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि भारतामध्ये व्यापार आणि एक्साइस ड्युटीवरून वाद सुरू आहेत. भारत अमेरिकेच्या उत्पादनांवर देशात मोठा कर लावतो. परिणामी भारतात अमेरिकन वस्तू ज्यादा किंमतींवर विकल्या जातात. यात अमेरिकेचे मोठे नुकसान होत आहे असा आरोप राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. त्याचाच परिणाम म्हणून अमेरिकेने भारतीय वस्तूंवर ज्यादा कर लावण्यासह बदाम आणि सफरचंदांवर सुद्धा निर्बंधांचा इशारा दिला होता. परंतु, दोन्ही देशांत झालेल्या चर्चेनंतर तो वाद मिटला. त्यावर देखील या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...