आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • US Social Worker Soros Says He Will Spend 7100 Crores To Fight Dictators Like Trump, Putin, Jinping

अमेरिकी समाजसेवक सोरोस म्हणाले- ट्रम्प, पुतीन, जिनपिंगसारख्या हुकूमशाही नेत्यांच्या मुकाबल्यासाठी 7100 कोटी खर्च करणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जॉर्ज सोरोस: जाॅर्ज सोरोस : फोर्ब्जच्या मते एकूण संपत्ती ६० हजार कोटी रुपये - Divya Marathi
जॉर्ज सोरोस: जाॅर्ज सोरोस : फोर्ब्जच्या मते एकूण संपत्ती ६० हजार कोटी रुपये

दावोस : दावोसमध्ये सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत गुरूवारी अमेरिकेतील अब्जाधीश समाजसेवक जॉर्ज सोरोस यांनी ट्रम्प व पुतीन यांच्यासह अनेक राष्ट्रप्रमुखांवर निशाणा साधला आहे. राष्ट्रीयत्वाचे मुद्देच बदलले आहेत. नागरी संस्कृतीचे पतन होत चालले आहे. मानवता कमी होत आहे, असे सांगून सोरोस यांनी भारतातील कलम ३७० व नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून पंतप्रधान नरेंद्र माेदींनाही लक्ष्य केले. पंतप्रधान मोदी भारताला हिंदू राष्ट्र बनवू इच्छितात, असा आरोपही त्यांनी केला. सोरोस म्हणाले, सध्याच्या काळात डोनाल्ड ट्रम्प, व्लादिमीर पुतीन व शी जिनपिंग हुकूमशहासारखे शासक आहेत. जगभरात अशा प्रकारे सत्तेवर पकड ठेवणाऱ्या शासकांच्या संख्येत सातत्याने वाढ होत चालली आहे. आगामी काळात या व्यक्तीच्या भाग्यावरच जगाची दिशा निश्चित होईल. सोरोस म्हणाले, सध्या आपण ऐतिहासिक परिवर्तनाच्या टप्प्यातून जात आहोत. खुला समाज ही संकल्पना संकटात आहे. त्याहून मोठे आव्हान आहे. ते म्हणजे हवामान बदल. आता माझ्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा प्रकल्प ओपन सोसायटी युनिव्हर्सिटी नेटवर्क (ओएसयूएन) हाच आहे. हे एक वेगळे व्यासपीठ आहे. त्यात जगभरातील सर्व विद्यापीठातील लोक अध्यापन व संशोधन करू शकतील. आेएसयूएनसाठी मी सुमारे ७१०० कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. हुकूमशाहीच्या विरोधातील संघर्षामधील हे माझे मोठे पाऊल ठरेल, असा दावा सोरोस यांनी केला. ट्रम्प हे आत्ममग्नतेचे शिकार आहेत, असे सोरोस यांना वाटते. कदाचित ट्रम्प राष्ट्राध्यक्ष निवडणुकीपर्यंत अर्थव्यवस्थेतील घसरणीला रोखण्याची शक्यता आहे. परंतु दीर्घकाळापर्यंत एक स्थिती कायम ठेवली जाऊ शकत नाही. जिनपिंगदेखील कम्युनिस्ट पार्टीची परंपरा मोडू लागले आहेत. त्यांनी स्वत:च्या भोवती सत्ता केंद्रित ठेवली आहे. चीनची अर्थव्यवस्था देखील आपला लवचिकपणा गमावू लागली आहे. जिनपिंग एक नव्या पद्धतीची सत्तावादी व्यवस्था तयार करू इच्छितात. त्यात खुल्या समाजास स्थान नाही.

द मॅन हू ब्रोक द बँक ऑफ इंग्लंडच्या रूपात चर्चित

जॉर्ज सोरोस अमेरिकेचे प्रसिद्ध हेज फंड मॅनेजर व अब्जाधीश दानशूर म्हणून ओळखले जातात. वॉल स्ट्रीटमध्ये करताना त्यांनी १९६९ मध्ये ८२ कोटी रुपयांपासून हेज फंड सुरू केला. नंतर त्याचे नाव क्वांटम फंड झाले. २००७ मध्ये या फंडाच्या साह्याने त्यांनी १९ हजार ७६७ कोटी रुपयांचा नफा कमावला. त्यांनी धर्मादाय कामांसाठी ४७ हजार ७१५ कोटी रुपये दान दिले. १९९२ मध्ये सोरोस फंडने १ हजार कोटी पाउंड विकले. त्यातून ६ हजार ८२१ कोटी रुपयांचा नफा झाला. त्यामुळे त्यांची 'द मॅन हू ब्रोक द बँक ऑफ इंग्लंड' अशी ओळख झाली.

बातम्या आणखी आहेत...