आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत सलग १२ दिवसांपासून वादळ; तीन मृत्युमुखी, १५० हून जास्त जखमी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र मिसोरीतील जेफर्सन सिटीचे आहे. वादळामुळे ५०० हून जास्त घरांची पडझड झाली आहे. - Divya Marathi
छायाचित्र मिसोरीतील जेफर्सन सिटीचे आहे. वादळामुळे ५०० हून जास्त घरांची पडझड झाली आहे.

वॉशिंग्टन - गेल्या तेरा दिवसांपासून अमेरिकेच्या विविध राज्यांत ३०० वादळांचा तडाखा बसला आहे. वादळ आणि पूरस्थितीमुळे परिस्थिती बिकट बनली आहे. त्यात तीन जणांचा मृत्यू झाला असून १५० हून जास्त लोक जखमी झाले. ओहिओ, मिसोरी, कन्सास प्रांतात मंगळवारी सायंकाळपासून धडकलेल्या वादळाने मोठी हानी झाली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे ७०० घरे व इमारती उद्ध्वस्त झाल्या. २५० शाळा व १५ रुग्णालयांचीही पडझड झाली. नॅशनल वेदर सर्व्हिसच्या सूत्रांच्या मते, वादळामुळे ५० लाख लोकांना विजेअभावी अंधारात राहावे लागत आहे. कन्सास व परिसरातील माँटगोमरी अधिकाऱ्यांनी गॅस पुरवठा करणाऱ्या वाहिन्या बंद करण्यात आल्याचे सांगितले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. आेहिआेच्या पश्चिमेकडे सोमवारी सायंकाळी उशिरा वादळामुळे डेटाउनमधील घरांचे छत उडून गेले आहे. गाड्यांचे ३०० मीटरपर्यंत ढिगारे झाले आहेत. वादळात ५० हून जास्त लोक जखमी झाले. ओक्लाहामामध्ये ढिगारेच ढिगारे दिसतात. मिसोरीमध्ये २१ लाख लोकांना विस्थापितांच्या छावण्यांत हलवण्यात आले आहे. 
 

 

कन्सासमध्ये कहर; चार कोटी लोकांना फटका 
> राष्ट्रीय हवामान विभागानुसार यंदा अमेरिकेतील विविध राज्यांत ९५० वादळे धडकली. वास्तविक सरासरी ७५० वादळे येतात. याच महिन्यात ५०० वादळे धडली होती.
> या आधी १९८० मध्ये ११ दिवसांपर्यंत सलग वादळे येत होती. या राज्यांत दरदिवशी सरासरी ८ वादळांचा मुकाबला करावा लागला होता. 
> हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार ईशान्येकडील त्यातही पेन्साल्व्हेनियापर्यंत हे संकट वाढू शकते. न्यूयॉर्कच्या स्टेटन आयलँड, एलिझाबेथ, न्यूजर्सीला देखील फटका बसू शकतो.
> गेल्या तीन दिवसांत नैसर्गिक संकट सर्वाधिक फटका कन्सासला दिसून आला. या भागातील सुमारे ४ कोटी लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. 
> कन्सासमध्ये दोन-तीन इंचाच्या गारा पडण्याची शक्यता आहे. 

बातम्या आणखी आहेत...