आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेची मुदत संपली; भारतात इराणमधून आयात बंद : राजदूत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - भारताने इराणमधून होणारी तेलाची आयात बंद केली आहे. अमेरिकेतील भारताचे राजदूत हर्षवर्धन शृंगला यांनी याला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, इराणमधून तेल खरेदी करण्यासाठी अमेरिकेने भारताला दिलेली मुदत दोन मे रोजी संपली आहे. त्यामुळे भारताने इराणमधून तेलाची खरेदी बंद केली आहे. भारताने एप्रिलअखेरपर्यंतच इराणमधील आयात कमी केली होती. तोपर्यंत प्रत्येक महिन्याला भारत केवळ १० लाख टन कच्च्या तेलाची आयात करत होता. वास्तविक याआधी भारत इराणमधून २५० कोटी टन कच्चे तेल आयात करत होता.


शृंगला यांनी सांगितले की, ही अमेरिकेसाठी एक प्राथमिकता असल्याचे आम्हाला माहिती आहे. वास्तविक आम्हाला याचा पर्याय शोधावा लागणार असल्याने याची मोठी किंमत आम्हाला मोजावी लागणार आहे. भारताने इराणसह व्हेनेझुएलामधूनही कच्च्या तेलाची खरेदी बंद केली आहे. चीननंतर भारत जगातील सर्वात मोठा दुसऱ्या ंआहे. भारत मागणीच्या १० टक्के कच्चे तेल इराणमधूनच खरेदी करत होता.  २०१५ मध्ये अमेरिकेसह जगभरातील सहा मोठ्या देशांनी इराणसोबत सामंजस्य करार केला होता. त्यानुसार इराणने अणुबॉम्ब मिसाइल्स कार्यक्रम बंद करण्यास सहमत झाला होता. त्यामुळे इराणवरील आर्थिक निर्बंध काढण्यात आले होते. मात्र, ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांनी हा करार रद्द करून आर्थिक बंदी पुन्हा लावली आहे. 

 

चाबहार बंदरावर बंदीचा परिणाम होणार नाही

हर्षवर्धन यांनी विश्वास व्यक्त केला की, या निर्बंधांचा परिणाम चाबहार बंदराला विकसित करण्याच्या भारताच्या योजनेवर होणार नाही.  ते म्हणाले की, इराणमधील चाबहार बंदर अफगाणिस्तानसाठी  जीवनरेखा आहे. भारत या माध्यमातून अफगाण नागरिकांना मानवतावादी मदत पुरवतो. ही व्यवस्था कायम राहावी हे भारत-अमेरिका दोघांच्या हिताचे आहे. अमेरिकेने भारताला चाबहार बंदराचा विकास करण्यासाठी सूट दिलेली आहे.

बातम्या आणखी आहेत...