आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विषाणूशी लढण्यासाठी सेनेला पाचारण करू शकते अमेरिका, 61 हजार कोटी रुपयांचे इमर्जन्सी बिल पास

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन : अमेरिकेमध्ये कोरोना व्हायरसमुळे 14 लोकांचे प्राण गेले. व्हायरस येथील 19 राज्यांमध्ये पसरले आहे, 228 लोक याची शिकार झाले. यानंतर ट्रम्प सरकार आता या व्हायरसला पसरण्यापासून रोखण्यासाठी सेनेला बोलवण्याचा विचार करत आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोना उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यामध्ये जास्त वेगाने पसरण्याची शक्यता आहे आणि अमेरिकेमध्ये हिवाळा सुरु होणार आहे. त्यामुळे याला रोखण्यासाठी आणखी मोठी पाऊले उचलली गेली पाहिजेत. याबद्दल पेंटागनमध्ये शास्त्रज्ञ आणि सेनेची बैठकदेखील झाली. साऊथ कॅरोलिनाच्या मिल्ट्री बेसवर कोरोना व्हायरसपासून लढण्याची तयारीदेखील सुरु केली आहे. 

57.46 हजार कोटी रु. स्थानिक आरोग्य विभागांना दिले जातील... 

अमेरिकन संसद काँग्रेसने कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी 61.15 हजार कोटी रुपयांचे इमर्जन्सी बिल पास केले आहे. याला सहीसाठी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना पाठवले गेले आहे. झाले असे की, अनेक अमेरिकन राज्यांना सांगितले गेले होते की, कोरोना व्हायरससोबत लढण्यासाठी त्यांच्याकडे ट्रेनिंग आणि उपकरणांची कमतरता आहे. या रकमेतून 57.46 हजार कोटी रुपए व्हायरसचा सामना करण्यात खर्च केले जाईल. जेणेकरून स्थानिक आरोग्य विभाग सुरुवातीच्या काळातच याच्याशी लढू शकतील. याव्यतिरिक्त 3.68 हजार कोटी टेलीहेल्थ सर्व्हिससाठी संपतील. जेणेकरून वयस्कर लोकांचे घरीदेखील उपचार होऊ शकतील.  

चीन, दक्षिण कोरिया, ईरान आधीपासूनच सेनेची मदत घेत आहेत... 

यापूर्वी चीन, दक्षिण कोरिया, ईरान, हॉंगकॉंग यांसारखे देशही कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी आर्मीची मदत घेत आहेत. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने सुमारे 10 हजारपेक्षा जास्त जवानांना कोरोनासोबतच्या लढाईमध्ये ठेवले आहे. हे डॉक्टर सॅनिटायझेशन, ट्राफिक कंट्रोल आणि उपचारांमध्ये मदत करत आहेत. ब्रिटन आणि इटलीने आपल्या आर्मीला स्टॅण्डबाय मोडवर ठेवले आहे.  

जेम्स बॉन्डच्या चित्रपटाची रिलीजिंग डेट 7 महिन्यांसाठी पुढे ढकलली... 

कोरोनामुळे जेम्स बॉन्डचा नवा चित्रपट 'नो टाइम टू डाय' ची रिलीजिंग डेट 7 महिन्यांसाठी पुढे सरकवली आहे. न्यूयॉर्क प्रशासनाने 15 लाख मास्क वाटले आहेत. आणखी 3 लाखांची व्यवस्था केली गेली आहे, कोरोना रुग्णांसाठी रुग्णालयात वेगळ्या 1200 बेडची व्यवस्था केली गेली आहे. कॅलिफोर्नियामध्ये स्टेट इमर्जंसी जाहीर केली गेली आहे. अमॅझॉनने अमेरिकेमध्ये आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम कारण्याससांगितले आहे. वॉशिंग्टनच्या एका जिल्ह्यामध्ये सर्व शाळा बंद केल्या गेल्या आहेत. 

बातम्या आणखी आहेत...