आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आण्विक पेच : अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स यांचा इराणवर कठाेर निर्बंध लादण्याचा इशारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाॅशिंग्टन - अमेरिकेने आपल्या सुरक्षाहिताचा हवाला देत इराणवर आणखी कठाेर निर्बंध लादण्याचा इशारा दिला आहे. अमेरिकी उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स यांनी सांगितले की, मी स्पष्ट करू इच्छिताे की, इराणने अमेरिकी धैर्य व संकल्पाची परीक्षा घेऊ नये. आम्ही चांगल्याची आशा बाळगताे. मात्र, अमेरिका व त्यांचे सैन्य खाडी क्षेत्रात आपले हित व नागरिकांचे संरक्षण करण्यास कायम तत्पर आहे. पेन्स यांनी ही बाब इस्रायल समर्थित ख्रिश्चन संघटना क्रिश्चियन युनायटेड फाॅर इस्रायलच्या वार्षिक परिषदेत सांगितली.

 

अमेरिकी उपाध्यक्षांनी सांगितले की, इराणच्या अर्थव्यवस्थेवरील कडक निर्बंध सुरू ठेवले पाहिजेत. इराणने आंतरराष्ट्रीय अणु कराराच्या कराराअंतर्गत युरेनियम संवर्धनाची मर्यादा आेलांडली आहे,अशा स्थितीत पेन्स यांचे हे वक्तव्य आले आहे. इराणने ३.६७ टक्के ठरलेली मर्यादा आेलांडून आपले युरेनियम संवर्धन ४.५ टक्के केले आहे. इराणच्या अणुऊर्जा संघटनेचे प्रवक्ते बहरुज कमालवंडी यांनी ही घाेषणा केली.


२०१५ मध्ये झाला हाेता इराणसोबत करार
२०१५ मध्ये इराणने अमेरिका, चीन, रशिया, जर्मनी, फ्रान्स व ब्रिटनसाेबत एका करारावर स्वाक्षरी केली हाती. या करारांतर्गत इराणने त्याच्यावरील निर्बंधांच्या बदल्यात आपला अणुकार्यक्रम मर्यादित करण्यावर संमती दर्शवली हाेती. संयुक्त राष्ट्र सरचिटणीस अँटाेनियाे गुटेरेस यांच्या म्हणण्यानुसार, इराणच्या या पावलांमुळे त्यांना आर्थिक फायदा मिळणार नाही.


ट्रम्प यांच्याकडून ब्रिटिश राजदूत डराेच यांच्यावर टीका
वाॅशिंग्टन| अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील ब्रिटनचे राजदूत किम डराेच यांच्यावर टीका केली असून अमेरिका त्यांना जास्त दिवस सहन करणार नसल्याचे म्हटले आहे. डराेच यांनी ट्रम्प प्रशासन निष्क्रिय असल्याचे म्हटले आहे. त्यावर ट्रम्प यांनी डराेच यांना फटकारले. ट्रम्प यांनी डराेच यांच्या रविवारच्या मेलचा उल्लेख करत टि्वट केले की, मी ब्रिटिश राजदूतास आेळखत नाही, मात्र ते अमेरिकेत पसंत केले जाऊ शकत नाही. आम्ही त्यांना जास्त दिवस सहन करू शकत नाहीत. ट्रम्प यांनी ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा मे व त्यांच्या ब्रेक्झिट मुद्दा हाताळण्याच्या पद्धतीवरही नाराजी व्यक्त केली. ब्रिटन व थेरेसा मे यांनी ज्या पद्धतीने ब्रेक्झिट हाताळले त्यावर मी खूप टीका करत आलाे आहे. त्यांनी व त्यांच्या प्रतिनिधींनी गडबडी केल्या, हे कसे केले जावे याचा सल्ला दिला,मात्र त्यंानी अन्य मार्ग अंगिकारला,असे ट्रम्प म्हणाले.

अमेरिकेच्या निर्बंधांतही इराणसोबत व्यापार कायम : रशिया 
इराणविरुद्ध अमेरिकेने लावलेल्या निर्बंधाकडे डोळेझाक करत इराणसोबत व्यापार सुरूच राहील, असे रशियाने म्हटले आहे. युरोपीय संघातील रशियाचे कायम सदस्य व्लादिमीर चिझोव यांनी सांगितले की, आमचे सकारी विचारणा करतात की रशिया व चीन व्यापार विनियमयात सहकार्यासाठी तंत्र(इंटेक्स) का स्थपन करत नाहीत. याची आवश्यकताच का?, हे आमचे उत्तर आहे.


 

बातम्या आणखी आहेत...