Home | International | Other Country | us warn pakistan for terrorism cooperation

दहशतवाद्यांचा तत्काळ खात्मा करा, अमेरिकेचा पाकिस्तानला दम

वृत्तसंस्था | Update - Mar 09, 2019, 11:46 AM IST

पाकिस्तानला आपल्यावरील हवाई कारवाई नकाे असल्यास व क्षेत्रीय स्थैर्य टिकवायचे असल्यास दहशतवाद्यांचा खात्मा करा.

  • us warn pakistan for terrorism cooperation

    वॉशिंग्टन - पाकिस्तानला आपल्यावरील हवाई कारवाई नकाे असल्यास व क्षेत्रीय स्थैर्य टिकवायचे असल्यास दहशतवाद्यांचा खात्मा करा. त्यासाठी सातत्यपूर्ण कारवाया करा, अशा शब्दांत अमेरिकेने दम भरला आहे.


    पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानवर जागतिक पातळीवरील दबाव वाढू लागला आहे. भारताने जैश-ए-मोहंमदच्या बालाकोटमधील अड्ड्यांना उद्ध्वस्त केले होते. २६ फेब्रुवारीच्या कारवाईमुळे पाकिस्तान धास्तावले. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रॉबर्ट पल्लाडिनो शुक्रवारी म्हणाले, दहशतवादाच्या विरोधात सातत्यपूर्ण कारवाई केली पाहिजे, असे आम्ही पाकिस्तानला वारंवार सांगत होतो. आताही भविष्यातील कारवाई नको असल्यास पाकिस्तानने वेळीच्या दहशतवाद्यांचा खात्मा केला पाहिजे.


    पाकिस्तानला दहशतवाद्यांचे नंदनवन बनवू नका. त्यांच्यापर्यंत आर्थिक रसदीचाही पुरवठा होणार नाही याची खबरदारी घ्या, असेही वारंवार बजावले होते. त्याकडे पाकिस्तानने दुर्लक्ष केले. वास्तविक दहशतवादी कारवायांच्या विरोधात सर्वांनी ठामपणे उभे राहिले पाहिजे. मसूद अझरला जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट करण्याची मागणी अमेरिकेनेदेखील लावून धरली आहे.

Trending