आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानने लवरात-लवकर हाफिज सईदवर कारवाई करावी, अमेरीकेचा पाकिस्तानला इशारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- अमेरिकेने पाकिस्तानला सल्ला वजा इशारा दिला आहे की, पाकने लवकरात लवकर हाफिज सईदला अटक करुन त्याच्याविरुद्ध खटला दाखल करावा. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागातील दक्षिण आणि मध्य आशियातील प्रकरणांच्या मंत्री एलिस जी वेल्स यांनी रविवारी  म्हटले की, "आम्ही 'लश्कर-ए-तैयबा'च्या दहशतवाद्यांना अटक केल्याचे स्वागत करतोत. जे लोक दहशतवादाने पीडित आहेत, त्यांना हाफिज सईद आणि इतर दहशतवाद्यांवर कारवाई झाल्याची पाहण्याचा हक्क आहे." पाकिस्तानने  10 ऑक्टोबरला हाफिज आणि त्याच्या काही साथीदारांना ताब्यात घेतले होते.पाकने हाफिजला अनेकवेळा अटक करुन सोडले आहे
पाकिस्तानचा दहशतवाद्यांना पकडण्याचा आणि परत त्यांना सोडण्याचा इतिहास आहे. यामुळेच एलिस वेल्स यांचे हे वक्तव्य महत्वाचे मानले जात आहे. पाकिस्तानने आंतराष्ट्रीय दबावात येऊन आतापर्यंत हाफिजला 8 वेळा अटक केले आहे. पण, प्रत्येक वेळेस त्याला कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोडून दिले जाते. 2008 मध्ये झालेल्या मुंबई हल्यानंतर पाकिस्तानने हाफिजला अटक केल्याचा दावा केला होता. पण, नंतर पुराव्याअभावी त्याला सोडून देण्यात आले.पाकिस्तानला एफएटीएफकडून ब्लॅकलिस्ट होण्याचा धोका
अमेरिकेकडून हे वक्तव्य अशा वेळेस आले आहे, जेव्हा टेरर फंडिंग आणि मनी लॉन्ड्रिंगवर लक्ष्य ठेवणारी आंतरराष्ट्रीय संस्था फायनांशियल अॅक्शन टास्क फोर्स(एफएटीएफ) पाकिस्तानला ब्लॅक लिस्ट करण्याचा निर्णय देणार आहे. रविवारी पॅरिसमध्ये एफएटीएफची बैठक सुरू झाली. ब्लॅक लिस्टपासून वाचण्यासाठी टेटर फंडिंगमधील दोषींवर कारवाई केल्याचे पाकिस्तानला सिद्ध करावे लागेल. एफएटीएफची बैठक 18 ऑक्टोबरपर्यंत चालेल.2018 मध्ये पाकला ग्रे लिस्टमध्ये टाकले होते
एफएटीएफने जून 2018 मध्ये पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकले होते. त्यासोबतच ब्लॅक लिस्टमध्ये जाण्यापासून वाचण्यासाठी 27 सूत्रीय अॅक्शन प्लॅन दिला होता. पाकिस्तानने अॅक्शन प्लॅनला नीट अप्लाय केले नाही, असे संस्थेला वाटल्यास पाकला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात येईल.ऑगस्टमध्ये पाकला फॉलोअप यादीत टाकले होते
त्याआधी ऑग्स्टमध्ये ऑस्ट्रेलियाच्या कॅनबरामध्ये झालेल्या बैठकीत एफएटीएफशी निगडीत एशिया पॅसिफिक जॉइंट ग्रुप(एपीजेजी) ने मानकांना पूर्ण न केल्यामुळे पाकिस्तानला इनहेन्स्ड एक्सपीडिएट फॉलोअप लिस्टमध्ये टाकले होते. ग्रुपने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान दहशतवाद्यांना अर्थिक मदत आणि मनी लॉन्ड्रिंगच्या 40 पैकी 32 मानकांचे पालन करत नाहीये.