आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकच्या लढाऊ विमानांवर अमेरिकेचीे निगराणी राहणार; ‘संरक्षण मदत रोखण्याच्या निर्णयात बदल नाही’

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाॅशिंग्टन - अमेरिकेने पाकिस्तानला लढाऊ विमानांसाठी तांत्रिक सहकार्य देण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने यावर शिक्कामाेर्तब केले असून त्यासंबंधी पेंटागाॅनने पाक पंतप्रधान इम्रान खान यांना कळवले आहे. 
पाकिस्तानच्या एफ-१६ लढाऊ विमानांची देखरेख व तांत्रिक सहकार्य करण्यासाठी १२.५ काेटी डाॅलरच्या अर्थात सुमारे ८६० कोटी रुपयांच्या लष्करी विक्रीस पेन्टागॉनकडून मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या अमेरिका दाैऱ्याच्या एका आठवड्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. ही मदत सुरू ठेवली जावी, अशी विनंती पाकिस्तानकडून करण्यात आली हाेती. त्यास मंजुरी देण्यात आली. एफ-१६ लढाऊ विमानांचा शांततापूर्ण कार्यक्रमाअंतर्गत वापर केला जाणार आहे. त्यामुळे सहकार्य केले जावे, अशी विनंती पाकिस्तानने केली हाेती. 


पाकिस्तानच्या या विमानांवर निगराणी ठेवण्याचीही परवानगी अमेरिकेला देण्यात आली आहे. दुसरीकडे पाकिस्तानची संरक्षण मदत राेखण्यात आलेली आहे. या धाेरणात मात्र काहीही बदल झालेला नाही. या मदतीमुळे संरक्षणाची मदत सुरू झाल्याचा अर्थ काेणीही काढू नये, असे अमेरिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. २०१८ मध्ये ट्रम्प यांनी पाकिस्तानची संरक्षण मदत थांबवली हाेती. 


पाकिस्तानचा खाेटारडेपणा 
अमेरिकेने तयार केलेल्या एफ-१६ लढाऊ विमानांचा वापर शांतता कार्यक्रमाअंतर्गत केला जाताे, असे सांगणाऱ्या पाकचा खाेटारडेपणा सिद्ध झाला आहे. कारण या लढाऊ विमानांचा वापर बालाकाेटच्या कारवाईनंतर भारताच्या विराेधात केला हाेता. दुसरीकडे पाकने ‘पीस ड्राइव्ह-वन’ असे या कार्यक्रमाला नाव दिले आहे. पाकिस्तानने एफ-१६ची ५४ विमाने मागवली हाेती. दरम्यान, उत्तर काेरियाने नुकत्याच केलेल्या क्षेपणास्त्र चाचणीचा अमेरिकेला काही धाेका नाही. लहान पल्ल्याच्या या क्षेपणास्त्रामुळे अमेरिकेवर संकट नाही. दाेन्ही काेरियांमध्ये वाद आहेत. त्यांचे भांडण आहे. त्यांनी अमेरिकेला धमकी दिलेली नाही, हे लक्षात घ्या. माझे किम जाँग उन यांच्याशी असलेले संबंध खूप चांगले आहेत. काय घडू शकते याकडे आमचे लक्ष असेल, असे ते म्हणाले. 

 

‘संरक्षण मदत रोखण्याच्या निर्णयात बदल नाही’

अमेरिका एफ-१६ या लढाऊ विमानांसाठी मदत करणार आहे. परंतु हा व्यवहार अमेरिकेच्या परदेश लष्करी विक्री सेवेअंतर्गत होत आहे. त्याचा दुसरा अर्थ पाकिस्तानला या सेवेसाठी माेबदला द्यावा लागणार आहे. देखरेख व निगराणीचे काम अमेरिकेतील ६० कंत्राटदार करणार आहेत. पाकिस्तानकडील लढाऊ विमानांची संख्या आता ५४ एवढी होईल. पाककडे १९६३ पासून एअर लिफ्टर विमान होते. 
 

 

बातम्या आणखी आहेत...