Home | International | Other Country | US Woman Brought Coyote Inside House Thinking It Was A Dog

Shocking: बेवारस 'कुत्र्यावर' महिलेला आली दया, घरी आणून घेतली काळजी; मग समोर आले भयंकर सत्य

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 03, 2018, 12:01 AM IST

कॅलिफोर्नियात राहणाऱ्या शेरॉन बर्टोजीने फेसबूकवर लिहिलेली पोस्ट नुकतीच चर्चेचा विषय ठरली होती.

 • US Woman Brought Coyote Inside House Thinking It Was A Dog

  स्पेशल डेस्क - कॅलिफोर्नियात राहणाऱ्या शेरॉन बर्टोजीने फेसबूकवर लिहिलेली पोस्ट नुकतीच चर्चेचा विषय ठरली होती. तिला आपल्या घराबाहेर एक अतिशय अशक्त आणि आजारी जनावर दिसून आले. हे एक श्वान असल्याचे तिला वाटले. दया करून तिने तो जनावर उचलून घरी आणला आणि त्याची देखभाल सुरू केली. हळू-हळू त्या जनावराने आपला खरा रंग दाखवण्यास सुरुवात केली. तेव्हा त्या महिलेले पोलिस आणि आपातकालीन विभागाला फोन करून मदत मागावी लागली.


  4 तासांत समोर आले सत्य...
  - पोर्चमध्ये अशक्त पडून असलेल्या जनावरावर महिलेला दया आली. तिने मदत करण्याच्या हेतूने त्याला घरात घेतले. त्या जनावराला जवळ घेऊन त्याला स्वच्छ करत असताना अवघ्या 4 तासांतच तिला हे श्वान नसल्याचे उमगले.
  - प्रत्यक्षात, ते जनावर एक कुत्र नसून कोयोट होते. अमेरिकेत कोयोट लांडग्याची एक जात आहे. आपल्या घरात लांडगा बोलावल्याचे लक्षात आल्यानंतर तिने वेळीच City of Folsom Animal Services च्या अधिकाऱ्यांना फोन लावला. अधिकारी घरी आले आणि त्या जनावराला सोबत घेऊन गेले.
  - लांडग्याला जेव्हा रेस्क्यू होम घेऊन जात होते, तेव्हा त्याच्या शरीरात पाण्याची कमतरता होती. तसेच सर्वत्र खाज सुटली होती. रेस्क्यू टीमने त्याला स्वच्छ करून औषधोपचार केले. ती एक मादा लांडगा होती. रेस्क्यू टीमने तिले प्रिन्सेस असे नाव दिले.
  - काही दिवसांत प्रिन्सेसच्या अवस्थेत सुधारणा झाली. तिच्या शरीरावर पुन्हा केस उगवले. पूर्णपणे बरी झाल्यानंतर तिला जंगलात सोडण्यात आले.

 • US Woman Brought Coyote Inside House Thinking It Was A Dog

Trending