आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेच्या महिला अधिकाऱ्याचे एमपीच्या शेतकऱ्याशी लग्न; फेसबुकवरून झाली मैत्री

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

होशंगाबाद - मध्य प्रदेशातील सिवनी माळव्याच्या बिसोनी गावातील शेतकरी दीपक (३६) राजपूत याची अमेरिकेच्या जेलिका लिजेथशी (४०) फेसबुकवर झालेली मैत्री होळीच्या दिवशी विवाहात बदलली. जेलिका लिजेथ अमेरिकेच्या मनुष्यबळ विभागात (एचआरडी) अधिकारी आहे. ती दोन महिन्यांपूर्वी भारतात आली होती. यादरम्यान दोघांच्या अनेक भेटीगाठी झाल्या. होळीच्या दिवशी त्यांनी नर्मदेच्या तीरावरील चित्रगुप्त मंदिरात लग्नगाठ बांधली. नंतर या नवपरिणीत जोडप्याने एकमेकांना रंगही लावला. 

 

जेलिका लिजेथ म्हणाली की, तिला भारतीय संस्कृतीनुसार लग्न करायचे होते. यासाठी होशंगाबादमध्ये येऊन लग्न केले. तत्पूर्वी, उभयतांनी नोंदणी पद्धतीने लग्न केले. दीपक म्हणाला की, त्याने बीकॉमपर्यंतचे शिक्षण घेतलेले आहे. तो भारतीय लष्करात तंत्रज्ञही राहिलेला आहे. 

 

जेली अमेरिकेच्या टॉस बोलव्हिया शहराची रहिवासी

जेली अमेरिकेच्या टॉस बोलव्हिया शहराची रहिवासी आहे. तीन वर्षांपूर्वी तिची फेसबुकवरून दीपकशी मैत्री झाली होती.  यानंतर दोघांत नियमितपणे व्हॉट्सअॅपवरून चॅटिंग होऊ लागली. नंतर फोनवरही बोलणे होऊ लागले. मैत्री प्रेमात बदलली. दीपकने लग्नाची इच्छा व्यक्त केली व जेलीने होकार दिला. दोघांचेही कुटुंबीय लग्नामुळे आनंदी असल्याचे दीपक म्हणाला.

बातम्या आणखी आहेत...