Home | Sports | Other Sports | usain bolt participate in compitition

युसेन बोल्टच्या थराराची जादू पसरली जगभर!

Agency | Update - May 31, 2011, 01:42 PM IST

जगातला सर्वाधिक वेगवान पुरुष युसेन बोल्टचा थरार पाहण्यासाठी जगभरातील त्याच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

  • usain bolt participate in compitition

    bolt_258_01लंडन - जगातला सर्वाधिक वेगवान पुरुष युसेन बोल्टचा थरार पाहण्यासाठी जगभरातील त्याच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. लंडन ऑलिम्पिक स्पध्रेत पुरुषांच्या 100 मीटर शर्यतीचा रोमांच अनुभवण्यासाठी आतापर्यंत तब्बल 10 लक्ष चाहत्यांनी तिकिटांसाठी विनंती केल्याचे वृत्त आहे. लंडन ऑलिम्पिक स्पध्रेच्या आयोजकांना आतापर्यंत पुरुषांच्या 100 मीटर शर्यतीचा आनंद लुटण्यासाठी तिकिटांची सर्वाधिक मागणी होत आहे. ही शर्यत लंडन ऑलिम्पिकसाठी तयार करण्यात येत असलेल्या खास ऑलिम्पिक स्टेडियममध्ये होणार आहे.

    या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता 1 लक्ष 20 हजार इतकी आहे. यातील 80 हजार खुल्या गटात प्रेक्षकांसाठी असून, 40 हजार तिकिटे आयोजक, मिडिया आणि व्हिआयपी कोट्यासाठी राखीव आहेत. इतक्या मोठया संख्येने 100 मीटर शर्यतीला मागणी असल्याने अनेक चाहत्यांच्या पदरी निराशा पडण्याची शक्यता आहे.Trending