आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेक वर्ल्डमध्ये होतीये 'USB काँडोम'ची चर्चा, जाणनू घ्या काय आहे ही नवीन भानगड...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डेटा सिक्योरिटीसाठी आहो उपयोगी

गॅजेट डेस्क- भारतीय टेक बाजारात सध्या USB काँडोमची चर्चा सुरू आहे. तसेच, याची डिमांडही वाढत आहे. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की, ही यूएसबी काँडोमची नवीन भानगड काय आहे. यूएसबी काँडोमचा वापर स्मार्टफोनच्या सेफ्टी आणि डेटा सिक्योरिटीसाठी केला जातो. प्रश्नोत्तरामधून जाणून घ्या डेटा काँडोमची माहिती


प्रश्न: काय आहे USB काँडोम?

उत्तर: USB काँडोमला USB डेटा ब्लॉकरदेखील म्हटले जाते. हे एक असे डिवाइस आहे, जे स्मार्टफोन, टॅबलेट किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक डिवाइसमध्ये पब्लिक प्लेसवर चार्जिंगदरम्यान वापरले जाते. हा युजरच्या डेटाला "जूस जॅकिंग" होण्यापासून वाचवतो. दिसायला हा सामान्य पेन ड्राइव्हप्रमाणेच दिसतो.


प्रश्न: जूस जॅकिंग काय आहे

उत्तर: जूस जॅकिंग एकप्रकरचा सायबर किंवा वायरस अटॅक आहे. ज्यात सायबर क्रिमीनल पब्लिक प्लेसवर वापरात असलेल्या यूएसबी पोर्टच्या माध्यमातून फोन, टॅबलेट किंवा इतर डिवाइसमध्ये मालवेअर इंस्टॉल करुन डेटा चोरतो. या प्रोसेसला जूस जॅकिं म्हणतात.


प्रश्न: कुठो होते जूस जॅकिंग?

उत्तर: सध्या पब्लिक प्लेस जसे रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट, बस स्टँड्स किंवा हॉटलमधील मोबाइल चार्जिंग पॉइंटच्या जागी यूएसबी पोर्ट असतात. या पोर्टमध्ये चार्जिंग केबल लावून डिवाइसला चार्ज केले जाते. याच पोर्टवर सायबर क्रिमीनल्सची नजर असते.


प्रश्न: USB काँडोमला फोनमध्ये कसे वापरायचे?

उत्तर: USB काँडोम एक लहान USB एडॅप्टरसारखा आहे. यात इनपुट आणि आउटपुटचे दोन सोर्स असतात. म्हणजेच फोनला केबलच्या मदतीने आधी काँडोममध्ये कनेक्ट केले जाते, नंतर काँडोमला दुसऱ्या केबलने यूएसबी पोर्टमध्ये कनेक्ट केले जाते.


प्रश्न: कसे काम करतो USB काँडोम?

उत्तर: USB कँडोममध्ये PortaPow USB डेटा ब्लॉकर असतो. हे सोर्स मोबाइलला USB पोर्टशी कनेक्ट झाल्यावर चार्जतर करतोच, पण डेटा एक्सचेंजच्या सर्व परमिशन ब्लॉक करुन टाकतो.


प्रश्न: USB काँडोमची किंमत किती?

उत्तर: बाजारात वेगवेगळ्या क्वालिटीचे USB काँडोम येत आहेत. बिल्ट क्वालिटीच्या हिशोबाने यांची किंमत आहे. 500 रुपयांपासून 1 हजार रुपयांपर्यं याची किंमत असू शकते.

बातम्या आणखी आहेत...