Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | use-lemon-for-fairness

लिंबाच्या रोजच्या वापराने रंग होतो गोरा

दिव्य मराठी टीम | Update - May 19, 2011, 03:16 PM IST

आजच्या भौतिक युगात प्रत्येकाचीच सुंदर दिसण्याची इच्छा असते.

 • use-lemon-for-fairness

  आजच्या भौतिक युगात प्रत्येकाचीच सुंदर दिसण्याची इच्छा असते. मुलाच्या लग्नासाठी त्याचे आई-वडील गोऱया वर्णाच्या मुलीच्या शोधात असतात. मुलींना सुद्धा आपल्या नवऱयाचा रंग गोराच हवा असतो. तुम्ही तुमच्या सावळ्या रंगामुळे चिंतीत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आयुर्वेदातील काही उपायामुळे तुम्ही तुमचा सावळेपणा दूर करू शकता.

  १. एक बादली कोमट पाण्यात दोन लिंबांचा रस मिसळून काही महिने स्नान केल्याने तुमच्या त्वचेचा रंग उजळू शकतो. (या उपायामुळे त्वचेसंबंधातील अनेक आजारही दूर होतात)

  २. रिकाम्या पोटी गाजराचा रस सकाळ-संध्याकाळ घेतल्याने महिनाभरात तुमचा रंग उजळू शकतो.

  ३. रोज एक नग मुरलेल्या आवळ्याचा रस खाल्ल्याने दोन-तीन महिन्यात रंग उजळतो.

  रोज दुपारी आणि रात्री जेवणानंतर थोड्या प्रमाणात बडीशेप खाल्ल्याने रक्त साफ होते आणि त्वचेचा रंग बदलू लागतो.

Trending