आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
प्रयागराज- आम्ही कुंभमेळ्याच्या जागेपासून सुमारे २०० मीटर दूर संगमावर उभे आहाेत. येथून थाेडे पुढे गेल्यावर धक्कादायक दृश्य दिसले. तेथे पुजाऱ्यांच्या रांगेत बसलेले रामकृष्ण तिवारी हे एका भाविकाकडून स्वाइप यंत्राद्वारे दक्षिणा घेत हाेते. याबाबत माहिती देताना रामकृष्ण तिवारींनी सांगितले की, दहापैकी सुमारे ४ भाविक स्वाइप यंत्राद्वारे दक्षिणा देण्यास पसंती देत आहेत. येथे देश-विदेशातील नागरिक येतात व अलीकडे सर्व काही हायटेक हाेत आहे. त्यामुळे आपणही हायटेक का हाेऊ नये, असा विचार पुढे आला. तेथून पुढे गेल्यावर चार छत्र असलेले प्रभात मिश्र व टिळा स्पेशालिस्ट गाेपाल गुरू भेटले. हे दाेघे पेटीएमद्वारे दक्षिणा घेतात. या जागी असे अनेक पुजारी आहेत, जे अशा प्रकारे विविध डिजिटल पद्धती अंगीकारत अाहेत. याचप्रमाणे पंजाब नॅशनल बँकेतर्फेही कुंभमेळ्यात विशेषत्वाने 'ई-रुपया' कार्ड सादर केले जात आहे.
कुंभमेळ्याच्या माहिती विभागाचे उपसंचालक संजय राय सांगतात की, मेळा प्राधिकरणाशी पंजाब नॅशनल बँकेने एक एमओयू (करार) केला आहे. ज्यांना या मेळ्यात राेकड लंपास हाेण्याची भीती आहे, ते येथे लावलेल्या आमच्या स्टाॅलवर जाऊन राेकड जमा करत 'ई-रुपया' कार्ड घेऊ शकतात. कार्डात उरलेली रक्कमही परत देण्याची सुविधा आहे. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहतांनी सांगितले की, मेळ्यात हजार दुकानदारांना स्वाइप यंत्रे दिली जातील. याशिवाय इतर बँकांचे एटीएम बूथ व माेबाइल एटीएमही असतील. भाविकांना राेकडची चणचण जाणवणार नाही, असा अधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे. १० जानेवारीनंतर पुजारी व दुकानदारांना डिजिटल पेमेंटसह इतर सुविधा उपलब्ध करवून दिल्या जातील, असे काही अधिकाऱ्यांनी सांगितले. पेटीएमनेही अनेक दुकानांवर त्यांची सुविधा देणे सुरू केले आहे. तसेच आपत्कालीन स्थितीत एखाद्या रुग्णाला इतरत्र उपचार मिळावेत म्हणून या कुंभमेळ्यात प्रथमच एअर अॅम्ब्युलन्सची सुविधाही मिळणार आहे. यासह एंट्री पाॅइंट्सवर २० सिग्नेचर गेट बनवले जाणार असून, यातून भाविक आत प्रवेश करू शकतील. गंगा-यमुनेच्या किनाऱ्यावर वसलेले प्रयागराज कुंभमेळ्यासाठी सज्ज आहे. तसे पाहता हे अर्धकुंभ आहे; परंतु या वेळी सरकारकडून यासाठी माेठ्या कुंभमेळ्यासारखीच तयार सुरू असून, हा मेळा १५ जानेवारीपासून सुरू हाेत आहे.
हा कुंभमेळा विविध प्रकारे आगळावेगळा असणार आहे. यात पहिल्यांदाच लेसर लाइट व साउंड शाेचे आयाेजन केले जाईल व ते भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र असेल. याशिवाय संपूर्ण मेळा परिसरात आध्यात्मिक संगीत वाजत राहील व यातून कुंभ, संत-महात्मे, आखाडे व त्यांचे साधू, अध्यात्म आदींची माहिती दिली जाईल. तसेच मेळा परिसराचा ४५ किमीपर्यंत विस्तार केला गेला आहे. यात ५०० 'कुंभमित्र' भाविकांच्या मदतीसाठी तैनात असतील व प्रयागराजला येणारे भाविक प्रथमच 'अक्षयवट' चे दर्शन करू शकतील. यास प्रयागराजचे छत्र म्हटले जाते व ब्रह्मा-विष्णू-महेशाचे रूप मानले जाते. हेल्पलाइनसाठी १०० व १९२० हे दाेन क्रमांक जारी केले आहेेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.