आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिंबाच्या वापराने दूर होईल केसातील कोंडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण सर्वच आपल्या केसांची निगा राखतो, पण तरीदेखील केसांच्या समस्या होत राहतात. केसात कोंडा होणे, केस गळणे, केस पांढरे होणे इत्यादी. कोंडा ही सामान्य समस्या असून त्याचा त्रास होतो. कोंडा आपल्या केसांसाठी हानिकारक असतो. आपले केस काळे, लांब, दाट करण्यासाठी केवळ महिलाच नाही तर पुरुषदेखील वेगवेगळे उपाय करत असतात. जाणून घेऊया केसांमध्ये कोंडा होण्याची कारणे व उपाय. १. लिंबू आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. ३ ते ४ लिंबू घ्या व त्यांची साले काढून जवळपास अर्धा लिटर पाण्यात १५ ते २० मिनिटांसाठी उकळा. नंतर पाणी थंड झाल्यावर ते आठवड्यातून २ वेळा आपल्या केसांमध्ये लावा. असे केल्याने आपल्या केसांमधील कोंडा दूर होईल आणि आपले केस चमकदार होतील.

२. दही आपल्या केसांसाठी खूप उपयुक्त आहे. आपल्या केसात थोडेसे दही कमीत कमी एका तासासाठी लावून ठेवा. नंतर केस नीट धुवून घ्या. असे केल्याने आपल्याला फरक जाणवेल. ही प्रक्रिया आठवड्यातून २ ते ३ वेळा केल्याने फायदा होईल.

३. कडुलिंबामध्ये भरपूर औषधी गुणधर्म असतात. याच्या वापराने अनेक रोग बरे होतात. कडुलिंबाची पाने बारीक वाटून घेत त्याची पेस्ट बनवा आणि आपल्या केसांमध्ये लावा. याने केसातील कोरडेपणा दूर होईल आणि पांढरे केस काळे होतील.

४. तुळसदेखील केसांसाठी उपयुक्त आहे. तुळशीची पाने व आवळ्याची पावडर पाण्यात मिसळा व त्याचा लेप बनवा. याने केसांची मालिश करा. अर्धा तास तसेच ठेवा आणि नंतर केस धुवून घ्या. केसांना फायदा होईल.

५. अंडी आपल्या शरीरासाठी खूप लाभदायी असतात. अंडी खाल्ल्याने आपल्या शरीरातील पोषक द्रव्यांची कमतरता दूर होते. तसेच अंडी आपल्या केसांसाठीदेखील फायदेशीर आहे. अंड्याची पेस्ट बनवून आपल्या केसांमध्ये लावल्याने कोंडा दूर होईल व कोरडेपणाही जाईळ. तसेच केस चमकदार व दाट होतील. यामुळे केसांचे गळणेदेखील थांबेल.

६. केसांमध्ये बदामाचे तेल किंवा खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह तेल गरम करून त्याद्वारे केसांची मालिश केल्यास कोंडा दूर होईल. तसेच ५ चमचे खोबरेल तेलात लिंबाचा रस मिसळा आणि ते आपल्या केसांमध्ये लावा. सफरचंद व संत्रा समप्रमाणात घेऊन त्याचा लेप बनवा आणि आपल्या डोक्याला लावा. हा लेप २० ते ३० मिनिटांसाठी तसाच ठेवा. नंतर केस स्वच्छ धुवून घ्या.