Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | Use Of Oil In Winter

हिवाळ्यात अशा प्रकारे तेल लावून कोणीही बनू शकतं सुंदर, एकदा अवश्य ट्राय करा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 08, 2018, 02:59 PM IST

उललेले ओठ, कोरडी त्वचा, केसांंमधील कोंडा अशा अनेक समस्या होतील दूर

 • Use Of Oil In Winter

  हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि निर्जीव होते. अशा वेळी आपण त्वचेला ग्लोइंग आणि हेल्दी ठेवण्यासाठी अनेक प्रकारचे कॉस्मेटिक्स यूज करतो. आज आम्ही तुम्हाला ऑलिव्ह ऑइल विषयी सागंणार आहोत. ऑलिव्ह ऑइल फ्री रॅडिकल्सपासुन सेल्सला डॅमेज होण्यापासुन वाचवतात. जर याचा समावेश भोजनामध्ये केला तर ब्लडप्रेशरला नियंत्रित ठेवले जाऊ शकते. याचा वापर उटने, फेसमास्क इत्यादी रुपांमध्ये केला जाऊ शकतो हे त्वचेचा सुरकुत्यांपासुन बचाव करण्याचे काम करते.

  1. सुंदर नखे
  एक तासासाठी नखे ऑलिव्ह ऑइलमध्ये बुडवून ठेवा. असे केल्याने नखांचे क्यूटिकल्स मऊ आणि लवकचीक होतात. हे कोणत्याही क्रीम पेक्षा चांगले काम करते. तुम्ही पायांना स्वच्छ करुन त्यावर ऑलिव्ह ऑइल देखील लावू शकतात आणि कॉटनचे सॉक्स घालून झोपू शकता. असे केल्याने पेडीक्योरची गरज पडणार नाही.


  2. कोमल ओठ
  कोरड्या, उललेल्या ओठांवर ऑलिव्ह ऑइलने सकाळ-संध्याकाळ हल्की मालिश करा. असे केल्याने ओठ कोमल होतील.

  3. चेहरा उजळ करण्यासाठी
  चेहरा साध्या पाण्याने एकदा स्वच्छ धुवून घ्या. आता ऑलिव्ह ऑइलने मसाज करा. यानंतर अर्धा चमचा साखर घेऊन चेह-यावर चोळा. शेवटी कोमट पाण्यात एक कपडा भीजवून त्या कपड्याने चेहरा पुसून घ्या. काही दिवस असे केल्याने तुम्हाला जाणवेल की तुमचा चेहरा उजळला आहे.


  4. दूर होईल कोंड्याची समस्या
  थोडेसे ऑलिव्ह ऑइल आपल्या हातांवर घ्या आणि केसांना लावा. असे केल्याने तुमचे केस सिल्कि होतील. जर तुम्हाला कोंड्याची समस्या असेल तर ती देखील दूर होईल.


  5. आठवड्यातुन तीन वेळा
  लिंबूच्या रसामध्ये ऑलिव्ह ऑइल मिसळून चेह-याची आठवड्यातुन तीन वेळा चेह-याची मालिश करा. असे केल्याने फक्त सुरकुत्याच दूर होणार नाही तर चेह-याचा रंग देखील उजळून निघेल. यासोबतच हे केसांना लावल्याने याची चांगल्या प्रकारे कंडीशनिंग देखील होईल.

Trending