आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - गेला तो जमाना जेव्हा लोक एक कार घेऊन पिढ्या न पिढ्या ती बदलत नव्हते. रीसेल मार्केटमध्ये त्यामुळेच नव्या आणि आधुनिक कार मिळत नव्हत्या. सद्यस्थितीला देशात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड नव-नवीन मॉडेल लाँच करत आहेत. अशात केवळ टेक्नोलॉजी आणि हव्यासापोटी लोक नवीन मॉडेल घेण्यासाठी वेळोवेळी कार बदलत आहेत. त्यामुळेच, सेकंड हॅन्ड कार मार्केटची चलती आहे. लवकरात-लवकर रिटायर केल्या जाणाऱ्या या कार स्वस्त किमतीत विकल्या जात आहेत. यापैकी काहींची किंमत तर 50 हजारांपासून सुरू होत आहे. कुठे आणि कशा मिळवता येतील या कार... येथे जाणून घेऊ...
कुठे मिळतील या कार
या कारची ZigWheels, Quikr, Droom सारख्या वेबसाइट वरून ऑनलाइन खरेदी केली जाऊ शकते. जेथे तुमचे बजेट, ब्रांड आणि शहरानुसार कार सर्च करू शकता. त्यासोबतच कारची कंडिशन सुद्धा माहिती करून घेऊ शकता. कारच्या फ्यूल, बॉडी स्टाइलची संपूर्ण माहिती वेबसाइटवर उपल्बध आहे.
कोणत्या राज्यात होत आहे कारची विक्री
जुन्या कारची विक्री दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आणि छत्तीसगढमध्ये होत आहे. येथुन Maruti Suzuki Wagon R , Hyundai Santro, ford, honda city आणि Maruti Ezteem सारख्या कार स्वस्त खरेदी केल्या जाउ शकतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.