आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीपीचा त्रास असणाऱ्यांसाठी सैंधव मीठ आणि गरम पाणी फायदेशीर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हृदयविकाराचे रुग्णांमध्ये सर्वात कठीण समस्या म्हणजे रक्तदाब असते. हिवाळ्यात, रक्त आणि श्वसनमार्गाची नळी लहान होते. अशामध्ये रक्तदाब आणि श्वास नियंत्रित करणे फार महत्त्वाचे आहे. रक्तदाबच्या रुग्णांना आहारात सैंधव मीठ दिले गेले पाहिजे, हे रक्तदाब नियंत्रित करेल. तसेच श्वसनग्रस्त रुग्णांनी कफ होऊ नये यासाठी तांदूळ, दही, उडीद डाळ, साखर वापरणे टाळावे. हृदयासंबंधी आजार असणाऱ्यांनी गरम पाण्याने अंघोळ करून वाफ घेतली पाहिजे. यामुळे रक्तवाहिन्या वाहू लागतात, ज्यामुळे हृदयात रक्तपुरवठा नियमितपणे चालू राहतो.

  • सुंठ, काळे मिरे, तुळशीचे मिश्रण फायदेशीर

तीन ते चार लिटर पाण्यात सुंठ, काळे मिरे आणि तुळशीची पाने शिजवा. नंतर ते फिल्टर करून दिवसभर प्या. याने कफ तयार होत नाही. याने श्वास आणि हृदय समस्या टाळता येतात. पूर्ण हिवाळ्यात असे केल्याने कधीच समस्या उद्भवणार नाही.

  • ही सावधगिरी बाळगा

- दमा औषध आणि नियंत्रक इनहेलर्स वेळेवर आणि योग्य प्रकारे घ्या. - सिगारेट, सिगारच्या धुरापासून वाचावे. - फुप्फुसांना मजबूत करण्यासाठी श्वास घेण्याचे व्यायाम करा. - थंडीपासून स्वत:ला जपावे.

  • इनहेलर घेण्यास घाबरू नका

दम्याचे रुग्ण इनहेलर्स योग्य प्रकारे घेत नाहीत. केवळ २२ ते २५ टक्के लोक इनहेलरचा वापर करतात. म्हणून हे योग्य प्रकारे वापरावे. दिवाळीनंतरच्या प्रदूषणानंतर हा त्रास वाढतो. त्यामुळे इनहेलर वापरा.

  • सकाळी आणि संध्याकाळी फिरू नये

दिवाळीनंतर प्रदूषण आणि हिवाळी लक्षणे वाढतात. अशा परिस्थितीत श्वास आणि हृदयरुग्णांनी याची काळजी घेतली पाहिजे. सकाळी आणि संध्याकाळी फिरणे टाळावे. त्याऐवजी दुपारी सूर्यप्रकाशात फिरावे.

  • हे करणे टाळा :

- घरात धूळ होता कामा नये, स्वच्छता राखावी. - थंड पेय, आइस्क्रीम आणि फास्टफूडचे सेवन करणे टाळावे.