आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर घोषणापत्र देण्याचा महिना म्हणजे डिसेंबर, कर वाचवण्याचे उपाय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कराची चर्चा झाली तर लोक कर वाचवण्याचाच प्रयत्न करतात. करासंदर्भात त्यांच्या मनात भीती असल्याने असे होते. कराशी संबंधित तरतुदीमधून त्यांना मिळणारा फायदा माहिती नसल्याने ते असा विचार करतात. आपापल्या नियोक्त्याला करासंदर्भात घोषणापत्र देण्यासाठी लोक गुंतवणुकीचे विविध पर्याय शोधतात. अशा वेळी त्यांच्या मनातील अनिश्चितता डिसेंबर महिन्यात आणखी वाढते. कराच्या या हंगामात तुम्हाला त्रास होऊ नये, त्यासाठी या ठिकाणी काही टिप्स देण्यात येत आहेत. 

 

उत्पन्नामधील टप्पे ओळखा : जर कुटुंबामध्ये अनेक लोक काम करत असतील तर सर्व वेगवेगळे करदाते असायला हवे, हे निश्चित करा. तुमच्या पूर्ण कुटुंबाचे उत्पन्न कोणत्याही एका व्यक्तीचे उत्पन्न म्हणून दाखवले तर कराचे ओझे आणखी वाढेल. इतकेच उत्पन्न जर कुटुंबातील अनेक लोकांचे मिळून दाखवले तर कराचे ओझे कमी होईल. 


पगाराच्या संरचनेचे नियोजन : करात सवलतीचा फायदा मिळावा यासाठी पगाराची संरचना नेहमीच ग्रॉस कमी असणारी असावी. कराचे नियोजन करताना या पर्यायाचाही विचार करू शकता : - 

- ज्यांच्याकडे स्वत:चे घर नाही, त्यांच्या उत्पन्नातील मोठा वाटा हा घराचे भाडे भरण्यामध्ये जातो. सरकार भाड्याची पूर्ण रक्कम किंवा त्यातील एका भागावर करात सवलत देते. 
- जर 'लीव्ह ट्रॅव्हल अलाउन्स' (एलटीए) पगाराच्या संरचेनत असेल तर याचा करात सूट मिळवण्यासाठी वापर करू शकता. देशांतर्गत तुम्ही कोठेही फिरण्यासाठी गेला तर प्रवास खर्चावर तुम्हाला करात सवलत मिळेल. 
- कार्यालयात जाण्या-येण्यासाठी लागणारा १९,२०० रुपयांचा खर्च कराच्या कक्षेच्या बाहेर असतो. यासाठी कोणतेही प्रूफ किंवा पावती न देताच तुम्ही क्लेम करू शकता. 

 

निवृत्तीनंतरचे आयुष्य सुरक्षित करा : आपण जे काही कमावतो ते केवळ आजच्यासाठी नाही तर निवृत्तीनंतरही त्याचा लाभ पाहत असतो. प्राप्तिकर कायद्यातील कलम ८०-सी अंतर्गत दरवर्षी १.५ लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर सूट मिळवू शकता. यामध्ये निवृत्ती वेतन फंड, प्रॉव्हिडंट फंड, दीर्घ मुदतीसाठीचा जीवन विमा, इक्विटी लिंक्ड सेव्हिंग योजना, रिटायरमेंट फंड आदींचा समावेश आहे. १.५ लाख रुपयांवरती कलम ८०-सीसीडी अंतर्गत एनपीएसमध्ये ५०,००० रुपयांची गुंतवणूक करू शकता. 

 

कलम-८०-सी व्यतिरिक्त आणखी पर्याय : सामान्यपणे लोक ८०-सी हा कर कपातीचा एकमेव पर्याय असल्याचे मानतात. याव्यतिरिक्तही अनेक पर्याय उपलब्ध आहेत. 

 

- ८०-डी अंतर्गत तुम्ही कुटुंबाच्या आरोग्य विमा प्रीमियमवर २५,००० रुपयांपर्यंतची सूट घेऊ शकता आणि २५,००० रुपयांपर्यंतची सूट आई-वडिलांच्या विम्यावर मिळेल. ते ज्येष्ठ नागरिक असतील तर सवलतीची मर्यादा ३०,००० रुपयांपर्यंत असेल. याचप्रमाणे तुम्ही एकूण ५०-५५ हजार रुपयांपर्यंतची सूट घेऊ शकता. 
- ८०-ई अंतर्गत शैक्षणिक कर्जाच्या व्याजावरही सूट मिळते. यासाठी कोणतीच कमाल मर्यादा नाही. त्याअंतर्गत तुम्ही तुमच्या, पती/पत्नीच्या किंवा मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजावरील सूट मिळवू शकता. 
- घर खरेदी करणे जीवनातील महत्त्वाचे उद्दिष्ट असते. गृह कर्जासाठीच्या व्याजावर दरवर्षी दोन लाख रुपयांपर्यंतची सूट मिळवता येते. 
- काही रिलीफ फंड (जसे पीएम रिलीफ फंड) आणि धर्मादाय संस्थांना दान केल्यावरही ८०-जी अंतर्गत करात सवलत मिळते. बचत खात्यात १०,००० रुपयांपर्यंत व्याजही कराच्या मर्यादेच्या बाहेर आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...