आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Useless To Spread Publicity On Social Media, Social Media Does Not Reach 2 Lakh Voters

सोशल मिडियावर प्रचाराची फुशारकी मारणारे निरर्थक, 2 लाख मतदारांपर्यंत सोशल मिडिया पोहचत नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवापूर- आदिवासी बहूल भागातील नवापूर विधानसभा मतदार संघात सोशल मीडियाचा प्रचारासाठी वापर करणारे उमेदवार निरर्थक ठरत आहेत. काही उमेदवार सोशल मीडियावर प्रचार करून स्व:त ची फुशारकी मारत विजयाचे गणित लावत आहे. प्रत्यक्षात "विजय" यांच्यापासून दूर आहे. या भ्रमात राहणाऱ्या उमेदवारांची निकालाच्या दिवशी नक्की निराशा होईल.नवापूर विधानसभा मतदार संघात एकूण 2 लाख 87 हजार 922 मतदार आहेत. यात संपूर्ण नवापूर तालुक्यातील दहा जिल्हा परिषद गट तर नंदुरबार तालुक्यातील साडे तीन जिल्हा परिषद गट येतात. नवापूर तालुक्यात 165 गावे तर नंदुरबार तालुक्यात 63 गावांचा समावेश आहे. दोन्ही तालुक्यात एकूण गावाची संख्या 228 आहे. एका गावात सरसरी सोशल मीडिया वापरणारे 95 मोबाइल धारक आहेत. संपूर्ण 228 गावात सोशल मिडिया वापरणाऱ्यांची संख्या 21 हजार 660 एवढी आहे. 
एक मोबाईल साधारण चार लोक पाहतात. 86 हजार 640 लोकांपर्यंत सोशल मीडियाच पोहू शकतो. 2 लाख 1 हजार 282 लोकांपर्यंत सोशल मीडिया प्रचार व प्रसार पोहचत नाही. तरी देखील नवापूर विधानसभा मतदार संघात काही उमेदवार व उमेदवारांची चांदडचौकडी सोशल मीडियावरील प्रचार आणि प्रसार विजयाचे गणित लावून अकलेचे तार तोडत आहे. तर दुसऱ्या बाजूला प्रतिस्पर्धी उमेदवार जास्त गवगवा न करता गावागावात होम टू होम प्रचार करून प्रचार आणि प्रसारात पुढे गेला आहे. विधानसभेच्या निवडणुकीत सोशल मीडियाच्या तलावात बेडकाप्रमाणे डरवा-डरवा करण्यापेक्षा होम टू होम प्रचार नक्की लाभदायक ठरेल.शहरी भागात चांगला प्रतिसाद 

नवापूर, चिंचपाडा, विसरवाडी, खांडबारा, धानोरा, नटावद, कोठली, आष्टे, टोकरतलाव शहरी व मोठ्या गावात सोशल मीडियाचा प्रचाराचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कमी वेळत जास्त मतदारांपर्यंत पोहण्याचे उत्तम साधन आहे. असे असले तरी नवापूर विधानसभा मतदार संघात निर्णयाक मतदार ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे सोशल मीडिया प्रचार व प्रसार आदिवासी भागात निरर्थक ठरत असल्याचे चित्र आहे.

बातम्या आणखी आहेत...