आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सिंधिया तो बस झांकी है, सचिन पायलट बाकी है...', ज्योतिरादित्य यांच्या राजीनाम्यानंतर सोशल मीडियावर मीम्सची 'धुळवड'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सिंधिया यांच्या राजीनाम्याच्या ट्वीटला 15 मिनीटात 30 हजारांपेक्षा जास्त वेळा रीट्वीट केले

नवी दिल्ली- आज धुळवड आहे. या रंगांच्या उत्सवात मध्यप्रदेश काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी राजीनामा दिल्यापासून ते ट्विटरवर ट्रेंडींग आहेत. #JyotiradityaScindia, #ज्योतिरादित्यसिंधिया के साथ #WelcometoBJP या हॅश टॅगवरुन 10 लाखांपेक्षा जास्त ट्वीट्स झाले आहेत. फक्त 15 मिनीटात 30 हजारांपेक्षा जास्त लोकांनी सिंधिया यांच्या राजीनाम्याला रिट्वीट केले आहेत. सोशल मीडिया यूजर्सनी सिंधिया, मोदी, शाह, राहुल गांधी, सोनिया गांधी, कमलनाथ यांच्यावरील अनेक मजेशीर मेसेज पोस्ट केले आहेत.

काँग्रेसचे माजी नेते शहजाद पूनावालाने कमलनाथ यांच्यावर निशाना साधला आहे. त्यांनी लिहीले- कमलनाथ सरकार आयसीयूमध्ये आहे. त्यांच्या ट्वीटला 20 हजारांपेक्षा जास्त लोकांनी रीट्वीट केले आहे.

सिंधिया यांचा एक व्हिडिओदेखील व्हायरल होत आहे. यात ते एक कवितेचे वाचन करताना दिसत आहेत. ‘आंधियों की जिद है, जहां बिजलियां गिराने की, हमारी भी जिद है, वहीं आशियां बनाने की। उसूलों पर आंच आए तो टकराना जरूरी है, अगर जिंदा हो तो जिंदा नजर आना जरूरी है।’ ही कविता म्हणत आहेत.