आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Airtel 4G Hotspot device सोबत फ्री मिळेल 126GB पर्यंतचा डाटा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझनेस डेस्क- भारती एअरटेल कंपनीने आपल्या 4G Hotspot device सोबत प्रीपेड आणि पोस्टपेड युझर्ससाठी एक नवीन ऑफर सुरू केली आहे. या ऑफर अंतर्गत युझर्संना मोफत 126GB पर्यंत डाटा मिळणार आहे. मागील काही दिवसांपूर्वीच एअरटेलने  Prepaid यूझर्ससाठी Airtel 4G Hotspot device सोबत 399 रूपयांचा Prepaid प्लॅन सादर केला होता.

 

आता, 4 जी हॉटस्पॉट डिव्हाइसवर पोस्टपेड युझर्सनासुद्धा मोफत डाटा मिळणार आहे. यामध्ये युझर्सना एक महिन्यासाठी 50GB मोफत डाटा ऑफर केला जात आहे. नवीन रिवाइज्ड प्लॅन अंतर्गत युझर्सना जास्त व्हॅलिडीटी आणि डेटाचा लाभ दिला जात आहे. जाणून घेऊया या ऑफरविषयी...


Prepaid यूझर्ससाठी ऑफर
या ऑफरचा लाभ घेण्यासाठी यूझर्सला Airtel 4G Hotspot device एअरटेल स्टोरवरून ऑनलाइन किंवा ऑफलाइन खरेदी करावे लागेल. Airtel 4G Hotspot deviceची किंमत 1,500 रूपये आहे. Airtel 4G Hotspot device खरेदी केल्यानंतर आपल्याला Airtel 4G चा प्रीपेड किंवा पोस्टपेड प्लॅन घ्यावा लागेल.

 

जर आपण 399 रूपयांचा प्रीपेड प्लॅन घेत असाल तर यासोबत आपल्याला 84 दिवसांच्या व्हॅलिडीटीसोबत 126GB पर्यंत डाटा मोफत दिला जाईल. यामध्ये आपल्याला प्रतिदिन 1.5GB 4G डाटा देण्यात येईल. आणि मोफत डेटाचा वापर केल्यानंतर आपल्या 80kbps च्या स्पीडने अनलिमिटेड फ्री डाटा ऑफर केला जात आहे.

 

Postpaid यूजर्ससाठी ऑफर
एअरटेल 4जी हॉटस्पॉट डिव्हाइसवर Postpaid सिम कार्डचा वापर करण्याऱ्या युझर्सना एक महिन्यासाठी मोफत 75GB डाटा दिला जात आहे. जर आपण दिलेल्या डेटाचा वापर केला तर आपली इंटरनेट स्पीड कमी होऊन 80Kbps एवढी राहील. हॉटस्पॉट डिव्हाइसद्वारे आपण आपले स्मार्टफोन, टॅब, लॅपटॉप, स्मार्ट टीवी यासारखे डिव्हाइस कनेक्ट करू शकता.

 

तसेच, हॉटस्पॉट डिव्हाइसला आपण एकसोबत 10 डिव्हाइस जोडू शकता. यामध्ये 1,500mAh देण्यात आली आहे, जी एकदा जार्च केल्यावर 4 ते 6 तासांपर्यंत जाते. प्रवासादरम्यान Airtel 4G Hotspot device आपल्यासाठी इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी चांगला पर्याय ठरू शकतो. Airtel 4G Hotspot device अॅमेझॉनवरून खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.
 

बातम्या आणखी आहेत...