आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हम वो हैं जहाँ मुश्किले शर्मिंदा हैं..

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘ख्वाब टूटे हैं मगर हौसले जिंदा हैं... .’ ही ओळ औरंगाबाद येथील वैशाली शिंदेच्या बाबतीत तंतोतंत खरी ठरते. एकेकाळी उत्तम हॉकी आणि क्रिकेटपटू असलेल्या वैशालीचे दोन्ही पाय अपघातात निकामी झाले. तरीही खेळाप्रति प्रेम जागृत ठेवून आज ती नव्या उद्योगातही यशोशिखरावर पोहोचली आहे.
 
'ऐ जिंदगी देख, मेरे हौसले तुझसे भी बडे हैं..
‘हर रोज गिरकर भी मुकम्मल खडे हैं.. ऐ जिंदगी देख, मेरे हौंसले तुझसे भी बडे हैं...’ असे म्हणत माजी हॉकीपटू वैशाली शिंदे हिने अपंगत्वावर मात केली आहे.  रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमावल्यानंतरही तिने जिद्द, धैर्य आणि संयमाच्या बळावर स्वत:चे जग उभे केले आहेे.  आता आपल्यासारख्या इतर विकलांग मुलांना उभे करण्यासाठी ती लवकरच जिल्हास्तरावर  क्रीडा स्पर्धेचे आयोजन करणार आहे. यासाठी ती क्रीडा भारतीच्या अधिकाऱ्यांनाही भेटली आहे. लवकरच या स्पर्धा औरंगाबादेत सुरू होणार आहेत.

माजी हाॅकीपटू वैशाली बाबूराव शिंदे ही मूळ लासूर स्टेशन येथील रहिवासी. बालवयात उत्कृष्ट राज्यस्तरीय हॉकी आणि क्रिकेट खेळाडू होती. बालपणापासून खेळाची आवड असणाऱ्या वैशालीने विभागीय, राज्यस्तरीय आणि आंतरविद्यापीठ हॉकी स्पर्धेत मैदान गाजवताना अनेक पदके जिंकली.वैशाली जालन्यातील श्रीमती दानकुंवर महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. पुढे तिने एमएपर्यंत शिक्षण घेतले वैशालीने हाॅकीत मोठे नाव कमवावे, अशी तिचे वडील बाबूराव िशंदे (पोलिस उपनिरीक्षक) यांची इच्छा होती. वैशालीला हॉकी प्रशिक्षक व्हायचे होते. वडिलांनाही तिचे हे स्वप्न पूर्ण करायचे होते. कारण तिची मोठी बहीण डॉक्टर होती. मधलीला प्राध्यापक व्हायचे होते. वैशालीनेही तिचे स्वप्न पूर्ण करावे असे त्यांना वाटत होते. हेच स्वप्न उराशी बाळगून ती खेळत होती. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते.

सर्वकाही  सुरळीत सुरू असताना तिच्या सुंदर जीवनाला काळाची दृष्ट लागली. १६ मे  १९९९च्या रविवारी आपली डॉक्टर बहीण रेखा अरुण पाटील हिला भेटण्यासाठी ती जालन्याहून लासूर स्टेशनला छोट्या भावासह येत होती. रेल्वेतून उतरताना झालेल्या अपघातात तिने दोन्ही पाय गमावले. तिच्यावर दु:खाचे अाभाळ कोसळले. अपघातानंतर राज्यस्तरीय खेळाडू असलेल्या वैशालीला शासनाकडून कसलीच मदत मिळाली नाही. औरंगाबाद आणि जालन्याच्या काही संस्था आणि कॉलेजने तिला मदत केली. त्यानंतर तिने आपला खर्च भागवण्यासाठी पार्लर आणि ट्यूशनही सुरू केले. व्यवसायात उत्तुंग कामगिरी करत तिने ‘बिझनेस वुमन अवॉर्ड’ पटकावला.
अपंग असलो म्हणून काय झाले, संकटांना घाबरायचे नाही, परिस्थितीचा सामना करायचा...जीवन सुंदर आहे. ते जगायचे. या निर्धार करत २००१ मध्ये तिने इंडेनची गॅस एजन्सी मिळवली. ३६ स्पर्धकांतून तिने बाजी मारली. प्रारंभी कंपनीने अपंगत्व पाहून वैशालीला गॅस एजन्सी देण्याचे नाकारले. मात्र तिची इच्छाशक्ती आणि धाडस पाहून अखेर वैशालीला गॅस एजन्सी मिळाली. जिद्द आणि चिकाटीमुळे  २०१४-२०१५ मध्ये  तिला बिझनेस वुमन अवॉर्ड मिळाला. वैशाली सामाजिक कार्यातही सहभाग असते. आपल्यासारख्या कित्येक लोकांना ती मदतही करते. 
नंतर कंपनीनेच माहितीपट तयार केला

वैशालीचे काम पाहून इंडेन कंपनीने आपल्या देशभरातल्या वितरकांना प्रोत्साहन देण्यासाठी तिच्यावर एक माहितीपट तयार केला. जर्मन फूट आणि शार्ट पॅग इंडियन फूटच्या मदतीने वैशाली आज खंबीरपणे उभी आहे. 

लेखिकेचा संपर्क- ९६७३२०५९३२

बातम्या आणखी आहेत...