आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Usha Kiran First Woman COBRA Commando And The Winner Of Vogue Women Of The Year Award

देशाच्या पहिल्या महिला कोब्रा कमांडो, AK-47 घेऊन निर्भीडपणे फिरतात जंगलात; यांच्या नावानेही चळाचळा कापतात नक्षली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बस्तर - आज आम्ही तुम्हाला एका अशा बहादूर लेडी ऑफिसरबद्दल सांगत आहोत, ज्या छत्तीसगडच्या नक्षली प्रभावाच्या बस्तरमध्ये तैनात आहेत. त्यांच्या फक्त नावानेच नक्षलवाद्यांचा थरकाप उडतो. त्या आहेत CRPFच्या देशातील पहिल्या लेडी कोब्रा कमांडो उषा किरण, त्या गोरिल्ला टॅक्टिक आणि जंगल वॉरमध्ये निष्णात आहेत. त्यांना नुकतेच Vogue Women Of The Year तर्फे 'यंग अचीव्हर ऑफ द इयर' म्हणून निवडण्यात आले आहे. पुरस्कार स्वीकारताना 27 वर्षीय उषा किरण म्हणाल्या होत्या- तुम्ही स्त्रियांना सुरक्षा दलात जॉइन होण्यासाठी फक्त प्रोत्साहन द्या, बाकी काम त्या स्वत:च करतील.

 

ट्रेनिंग पूर्ण होताच म्हणाल्या- मला सर्वात अवघड ठिकाणी जॉइनिंग द्या...

- मूळच्या गुरुग्रामच्या रहिवासी असलेल्या या लेडी ऑफिसरने वयाच्या 25व्या वर्षी CRPF जॉइन केली होती. त्यांचे वडील आणि आजोबाही सीआरपीएफमध्ये होते.
- CRPFच्या 232 महिला बटालियनमध्ये एका वर्षाच्या ट्रेनिंगनंतर उषा किरण यांनी सीनियर्सना एकच मागणी केली होती की, त्यांची नियुक्ती जम्मू-काश्मीर, उत्तर-पूर्वेतील राज्ये किंवा नक्षल प्रभावित परिसरात करण्यात आली होती. 
- विशेष म्हणजे उषा किरण या CRPF च्या अशा पहिल्या महिला अधिकारी आहेत ज्यांनी नक्षल प्रभावित बस्तरच्या दरभा खोऱ्यात पोस्टिंग देण्यात आली होती. माजी राष्ट्रीय खेळाडू राहिलेल्या उषा किरण यांना CRPFची सर्वात खतरनाक विंग कोब्रामध्ये असिस्टेंट कमांडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
- दरभा तोच परिसर आहे जेथे 25 मे 2013 रोजी झीरममध्ये एकाच वेळी अनेक दिग्गज काँग्रेसी नेत्यांसह 32 जणांची नक्षल्यांनी अंत्यंत निर्घृणपणे हत्या केली होती.

 

AK-47 घेऊन फिरतात जंगलात...
- नक्षल्यांचा किल्ला भेदण्यासाठी या शूरवीर ऑफिसर AK-47 सारख्या शस्त्रास्त्रांनी नक्षल्यांना थेट भिडतात. शिवाय तेथे राहणाऱ्या तरुणी व महिलांच्या मनातील भीतीही दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत.
- अज्ञात जंगलात व खोऱ्यात ते निडर होऊन फिरतात, या खतरनाक परिसरात सर्च ऑपरेशनही चालवतात.
- या दलाचे काम नसल्यावर त्या शाळेतील मुलींना शिकवतात. याशिवाय निर्भीड होऊन पोलिसांची मदत करण्यासाठी प्रोत्साहनही देतात.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या लढवय्या महिला कमांडोचे काही Photos...  

 

बातम्या आणखी आहेत...