Home | Bollywood | Marathi Cinekatta | usha nadkarni entry in marathi serial ghadage and sun

घाडगे & सून मालिकेमध्ये होणार उषा ताईंची एन्ट्री, दिसणार या भूमिकेत

दिव्य मराठी | Update - Jan 15, 2019, 06:04 PM IST

घाडगे & सून या मालिकेमधील घाडगे सदन मध्ये माईची चुलत सासू म्हणून उषाजींची एन्ट्री होणार आहे

  • usha nadkarni entry in marathi serial ghadage and sun
    मुंबई. कलर्स मराठीवरील लोकप्रिय घाडगे & सून या मालिकेमध्ये बऱ्याच घटना घडत आहेत. मालिकेमध्ये घराची विभागणी झाली आहे... अक्षय आणि कियारा घाडगे सदनमध्ये परतल्यानंतर अमृता घर सोडणार अस सांगते यामुळे अण्णा आणि माई अमृताला संपत्तीमधला काही हिस्सा द्यावा... आणि यावरूनच वसुधा भांडणाची एक ठिणगी पाडते... आणि त्यामुळे घरामध्ये विभागणी होते हे प्रेक्षकांनी बघितले... इतके वर्ष जपलेलं हे कुटुंब अचानक तुटलं हे माईना सहन होत नाही त्यामुळेच माई आणि अण्णा पूर्णपणे खचून जातात... आता अमृता हा नात्यांचा गुंता कसा सोडवणार ? कसं घराला सावरणार ? अक्षय तिची मदत कशी करणार ? असे बरेच प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत... आणि आता या सगळ्यामध्ये मालिकेमध्ये एक वेगळेच वळण येणार आहे... कारण घाडगे सदन मध्ये एक नवी एन्ट्री होणार आहे... महाराष्ट्राच्या लाडक्या आऊ म्हणजेच उषा नाडकर्णी या एका महत्वाच्या भुमिकेमध्ये मालिकेमध्ये दिसणार आहेत... बऱ्याच दिवसानंतर त्या छोट्या पडद्यावर दिसणार आहेत... या आधी त्या बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दिसल्या होत्या, ज्यामध्ये त्यांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले... या मालिकेमध्ये त्यांची भूमिका कशी असेल ? हे बघणे रंजक असणार आहे.

    घाडगे & सून या मालिकेमधील घाडगे सदन मध्ये माईची चुलत सासू म्हणून उषाजींची एन्ट्री होणार आहे... आणि त्यांच्या स्वागताची लगबग आता सुरु झाली आहे... कियारा आणि अक्षयचे लग्न झाले आहे याची माहिती येणाऱ्या पाहुण्याला नसल्याने पुन्हाएकदा साडी आणि मंगळसूत्र घातलेली अमृता प्रेक्षकांना दिसणार आहे... या नव्या पाहुण्याच्या येण्याने विभक्त झालेले घाडगे कुटुंब एकत्र येईल का ? कोणाची मकर संक्रांत साजरी केली जाणार अमृता कि कियारा ? मकर संक्रांत निर्विघ्नपणे पार पडेल का ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Trending