डिस्पोजेबल कपमध्ये चहा / डिस्पोजेबल कपमध्ये चहा पित असाल तर सावधान, मेंदूवर होतो परिणाम आणि घडते असे काही

डिस्पोजेबल कपचा उपयोग ठरू शकतो इतका घातक.. 

दिव्य मराठी वेब टीम

Dec 06,2018 10:35:00 AM IST

नवी दिल्ली : जगभरात लोक चहाचे शौकीन आहेत. चहा हे सर्वांचेच आवडते पेय आहे. लोकांना चा हा कधीही आणि कुठेही हवा असतो. म्हणूनच सध्या डिस्पोजेबल कपमध्ये चहा पिण्याचे प्रमाण वाढले आहे. पण तुम्हाला माहित आहे का, की या कपमध्ये चहा पिण्याचे परिणाम किती भयंकर होऊ शकतात. दुकानात तर लोक या कपचा उपयोग करतच होते परंतु आता लोक या कपचा उपयोग घरातही करू लागले आहेत. पण डिस्पोजेबल किंवा थर्माकोलच्या कपमध्ये चहा पिणे इतके हानिकारक आहे की त्यामुळे कर्करोगदेखील होऊ शकतो. आजकालच्या धावत्या जगामध्ये लोकांकडे वेळ फार कमी असतो. त्यामुळे काही लोक भांडी भरवण्यापेक्षा डिस्पोजेबल कपमध्ये चहा पिणे पसंत करतात. पण त्याचा उपयोग आपल्यासाठी खूप घटक ठरू शकतो. डिस्पोजेबल कप पॉली-स्टीरीनपासून बनतात. जेव्हा त्या कपमध्ये गरम चहा टाकला जातो तेव्हा त्या चहासोबत काही हानिकारक तत्त्वही आपल्या पोटात जातात.

हे जे तत्व चहासोबत आपल्या पोटात जातात त्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता असते. यामुळे थकवा येणे, डोकेदुखी, हार्मोनल इम्बॅलन्स होणे अशा अनेक समस्या उद्भवतात. गरम चहा किंवा पाणी टाकल्यामुळे तो कप वितळू नये म्हणून त्याला वॅक्स लावलेले असते. त्याचप्रमाणे या कपमध्येब गरम चहा किंवा पाणी टाकल्यास ते वॅक्स वितळून पोटात जाते. डॉक्टरचेही असे म्हणणे आहे की डिस्पोजेबल कपमध्ये सतत चहा किंवा कॉफी पिल्यामुळे किडनी आणि लिव्हरचा कर्करोग होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर आणखीही काही भयंकर बिमाऱ्या तुम्हाला होऊ शकतात.

X
COMMENT